Breaking
महाराष्ट्र

आमची गुणी मुलं प्रतिष्ठान’ तर्फे साक्षी रोटेला शिष्यवृत्ती व पत्रकार सुनील क्षिरसागर यांचा सन्मान

न्यायभूमी न्यूज

0 8 9 9 9 4

न्यायभूमी 

विंचूर (नाशिक) दि.१ ऑक्टोबर सुनील क्षिरसागर

जय बजरंग मंडळ गल्लीतील श्री चौंडेश्वरी माता मंदिरात सुरू असलेल्या नवरात्र उत्सवाच्या दहा दिवसांच्या कार्यक्रमात अष्टमीच्या दिवशी (दि. ३० सप्टेंबर, मंगळवार) होम–हवन विधी मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला.

या वेळी धार्मिक कार्यक्रमासोबत सामाजिक उपक्रम राबवत ‘आमची गुणी मुलं प्रतिष्ठान’ तर्फे शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत कुमारी साक्षी रोटे (रा. विंचूर,ता.निफाड) हिला रु.१०,०००/- शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

प्रतिष्ठानचे डॉ.अशोक सिनगारे,किरण रोटे (पंढरपूर),निवृत्ती रूद्राक्ष (जालना),विनायक उमराणे (पुणे), विजय वांगीकर (जालना),प्रशांत येळाई (अहिल्या नगर),रामेश्वर नरखेडकर (वैराग),अनिता ताई ओगले यांनी साक्षीला शुभेच्छा दिल्या.

तसेच रेखा रोटे व समिक्षा रोटे यांचेही कौतुक करण्यात आले.

पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल व नुकत्याच मिळालेल्या‘उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार’ निमित्ताने पत्रकार सुनील क्षिरसागर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला विंचूर कोष्टी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र विभूते,सचिव नितीन दारके,ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रेय व्यवहारे, स्टेट बँकचे अमित मिंचे, श्याम कोष्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

धार्मिक विधीच्या भागात अष्टमीच्या होम-हवन पूजा पुरोहित बापू गुरु जोशी यांच्या हस्ते करण्यात आली.

यजमान म्हणून जयेश विभूते सहपत्नींसह पूजेस बसले होते.

या प्रसंगी सुभाष रोटे,राजेंद्र गोपाळ विभूते, संगीता मिंचे,रेखा रोटे तसेच विभूते,दारके, घट्टे, मिंचे परिवार व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विंचूर ग्रामस्थांनी देखील उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे