Breaking
गुन्हेगारी

साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त; नाशिक ग्रामीण पोलिसांची कामगिरी

अमली पदार्थ प्रकरणी 22 गुन्हे, 29 जण गजाआड

0 8 9 9 9 4

न्यायभूमी न्यूज

नाशिक दि,५ जून २०२५ अभय पाटील 

नाशिक ग्रामीण पोलिसांनी मागील तीन आठवड्यांत अमली पदार्था विरोधात विशेष मोहीम राबवत एन.डी.पी.एस.कायद्यांतर्गत २२ गुन्हे दाखल केले असून,२९ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत सुमारे आठ लाख ४९ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

ही विशेष मोहीम अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था),महाराष्ट्र राज्य व विशेष पोलीस महानिरीक्षक,नाशिक परिक्षेत्र यांच्या आदेशानुसार, ९ मे २०२५ ते ३१ मे २०२५ या कालावधीत राबविण्यात आली.

 

नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक बळवंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या मोहिमेत ४० पोलीस ठाण्यांतून अमली पदार्थ तस्करी व सेवनाविरोधात व्यापक तपास व कारवाई करण्यात आली.

गांजा,भांग,कोडीन फॉस्फेट व विविध प्रकारच्या टॅबलेट्स असा एकूण जप्त अमली पदार्थांचा तपशील गांजा ३५.९१२ किलो (किंमत ९.२९ लाख रुपये) टॅबलेट्स-(स्पास्ट्रान प्लस,निट्रावेट, अल्प्राजोलाम) ६,४९० गोळ्या (९.८४ लाख रुपये) कोडीन फॉस्फेट ५० बाटल्या (९०० मिली) – १,८०० रुपये भांग ४२०० किलो ३,२०० रुपये गांजा सेवनप्रकरणी ८ सेवाभोगींवर कारवाई आठ लाख ४९,२९१ रुपयांचा किमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

 

ही मोहीम नाशिक ग्रामीण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे,पोलीस अधीक्षक बळवंतराव पाटील,अप्पर अधीक्षक आदित्य मिस्त्री यांचे मार्गदर्शन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच स्थानिक पोलीस ठाण्यांचे सहकार्य लाभून यशस्वी झाली.

या मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे,गोविंद चौधरी,विजय चौधरी,दत्ता वाघमारे, रमेश शिंदे,जयवंत पाटील,मनोज गवळी,ललित शिरसाठ,नितीन विशाल आहेर,विनोद टिके, अमित मळघे आदींचा उल्लेखनीय सहभाग होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे