सुभाष नगर येथील जिल्हा परिषद शाळेतील भावी मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि १९ जुलै विशेष प्रतिनिधी सुनील क्षीरसागर
निफाड तालुक्यातील सुभाष नगर येथील विद्यार्थ्यांनी बजावला मतदानाचा हक्क शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी लोकशाहीने बहाल केलेल्या मतदानाचा हक्काबद्दल जनजागृती व्हावी.
तसेच मतदार जनजागृती होऊन मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने जिल्हा परिषद शाळा सुभाष नगर येथील उपक्रमशील.पदवीधर शिक्षक.यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी लोकशाहीची शाळा लोकोत्सव अभिरुप मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी शपथविधी मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.
यावेळी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कैलास देव्हाड बिबे सर, पवार सर, बडे सर शिंदे सर, काकवीपुरे मॅडम, शिंदे सर साबळे सर, पठाडे सर यांनी उपस्थितांना फुल गुच्छ देऊन स्वागत केले.
लोकशाहीची शाळा लोकोत्सव उपक्रमांतर्गत या मतदार जनजागृती व्हावी यानिमित्ताने वर्गातील विद्यार्थ्यांचे शालेय वर्ग मित्र मंडळ निवड केली अभिरुप मतदान प्रक्रिया राबवून लोकशाहीचा अनुभव दिला.
चंदू आबा लांडबले ग्रा.प सदस्य सुभाष नगर

आमच्या वर्गाची निवडणूक झाली प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया समजून घेत गुप्त पद्धतीने मतदान करण्याचे हक्क बजावला माझी लोकशाही पद्धतीने मतदान घेऊन मी निवडून आले.
संजीवनी सोदक.विद्यार्थिनी
कॅप्टन जिल्हा परिषद शाळा सुभाष नगर
लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन उपक्रमांतर्गत सुभाष नगर शाळेत घेण्यात आलेल्या अभिरूप मतदान प्रक्रिया हा विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीचा अनुभव देणारा धडा आहे.


