Breaking
महाराष्ट्र

लासलगावमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भव्य पथसंचलन; शस्त्रपूजन सोहळा उत्साहात संपन्न

1 2 9 4 0 5

न्यायभूमी 

लासलगाव दिनांक २१ ऑक्टोंबर 

लासलगाव येथे दिनांक २० ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवानिमित्त भव्य पथसंचलन आणि पारंपरिक शस्त्रपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवला. घोष पथकाच्या तालावर निघालेल्या पथसंचलनाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आयोजित या कार्यक्रमात परंपरेनुसार शस्त्रांचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रशांत आहेर सहकार्यवाह नाशिक जिल्हा ग्रामीण यांच्यासह संघाचे विमर्श संयोजक जयेश क्षेमकल्याणी उपस्थित होते.

 

यानंतर ग्रामपंचायत कार्यालय लासलगावच्या प्रांगणातून पथसंचलनाला सुरुवात झाली. त्यानंतर ओहोळ भाग, आरजे मॉल, बसस्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, लासलगाव पोलीस ठाणे समोरीन बाजारतळ, महादेव मंदिर, इच्छापूर्ती गणपती मंदिर, अहिल्यादेवी किल्ल्याच्या पाठीमागील परिसर, पाटील गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि प्रभू श्रीराम त्रिफुली कोटमगाव रोड या मार्गांवरून संचलन मार्गक्रमण करत कृषी उत्पन्न बाजार समितीतील भगरी बाबा मंदिर येथे सांगता करण्यात आली. हातात दंड, अंगावर पूर्ण गणवेश आणि चेहऱ्यावर शिस्तीचे प्रतिबिंब अशा वातावरणात स्वयंसेवकांनी संचलनात सहभाग घेतला. पथसंचलन मार्गावर स्थानिक नागरिकांनी, विशेषतः महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढून तसेच पुष्पवृष्टी करून स्वयंसेवकांचे स्वागत केले.

 

पंच परिवर्तनाचा संदेश

नाशिक जिल्हा ग्रामीणचे सहकार्यवाह प्रशांत आहेर यांनी कार्यक्रमादरम्यान उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय एकात्मता, कुटुंबप्रबोधन, पर्यावरण रक्षण, सामाजिक समरसता आणि ग्रामविकास या पंच परिवर्तनाच्या विषयांवर विशेष भर दिला. समाजातील प्रत्येक घटकाच्या सहभागातून सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रनिर्मितीचे कार्य पुढे नेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

पारंपरिक शस्त्रपूजन, शिस्तबद्ध पथसंचलन आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश यांमुळे लासलगावमधील विजयादशमी उत्सवाचे वातावरण उत्साहपूर्ण झाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 2 9 4 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे