संविधान दिनानिमित्त सटाण्यात अशोकस्तंभ परिसरात संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन
संविधान समन्वय समिती व बागलाण वैभव सोशल फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

न्यायभूमी
सटाणा दिनांक २७ नोव्हेंबर

संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान समन्वय समिती, बागलाण आणि बागलाण वैभव सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बागलाण तहसील कार्यालय परिसरातील अशोकस्तंभ येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी तहसील कार्यालय परिसरातील अशोकस्तंभाला चहूबाजूंनी पुष्पमाला बांधून करून तसेच आकर्षक रांगोळी काढून सजविण्यात आले होते.

कार्यक्रमस्थळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह भारतीय संविधानाच्या पुस्तकाची प्रत ठेवण्यात आली होती. उपस्थित मान्यवर व संविधानप्रेमींनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधानाप्रती आदर व्यक्त केला. त्यानंतर सर्वांनी एकत्रितपणे संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन संविधान समन्वय समितीचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे बागलाण तालुका महासचिव दादा खरे आणि बागलाण वैभव सोशल फाउंडेशनचे संस्थापक तथा संविधान समन्वय समितीचे कार्याध्यक्ष वैभव गांगुर्डे यांनी केले होते.

यावेळी सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील, नगरसेविका लताताई पोपट बच्छाव, नगरसेवक पंकज सोनवणे, दीपक सोनवणे, भाक्षी ग्रामपंचायतीचे सरपंच तथा संविधान समन्वय समितीचे युवा विभाग प्रमुख चेतन वणीस, उपसरपंच भास्कर पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील जगताप, प्रफुल्ल कुवर, समता परिषदेचे यशवंत कात्रे, पत्रकार श्रीकांत रौंदळ, शशिकांत कापडणीस, वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष शेखर बच्छाव, निलेश देवरे, संविधान समन्वय समितीचे प्रसिद्धी व जनसंपर्क प्रमुख संदीप गांगुर्डे, महिला प्रमुख रोहिणी गायकवाड, कार्यक्रम प्रमुख कडू वणीस, सामाजिक कार्यकर्ते पंडित आबा, चौगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच उत्तमराव शेवाळे, कैलास अहिरे, नाना वणीस यांच्यासह मोठ्या संख्येने संविधानप्रेमी नागरिक उपस्थित होते.

संविधान दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा संदेश देण्यात आला. संविधानाची उद्देशिका केवळ वाचण्यापुरती मर्यादित न राहता तिच्यातील मूल्ये दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

सूत्रसंचालन शशिकांत कापडणीस यांनी केले.


