Breaking
महाराष्ट्र

विचूर रोड रिक्षा बसथांबा ते बसस्थानकापर्यंत रस्त्याची चाळण; लोखंडी गज बाहेर, वाहनचालकांचा जीव धोक्यात!

लासलगावचा मुख्य रस्ता की अपघातांना निमंत्रण?

1 4 4 8 6 9

न्यायभूमी 

लासलगाव :दिनांक २७ नोव्हेंबर विशेष वृत्त

लासलगावच्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, विचूर रोडवरील रिक्षा बसथांब्यापासून ते बसस्थानकापर्यंतच्या जुन्या काँक्रिट रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावरील काँक्रिट उखडल्याने लोखंडी गज बाहेर आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

रस्त्याची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत असताना, अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

रस्ता मंजूर झाल्याच्या चर्चा; मग कामाला मुहूर्त कधी?

रस्ता मंजूर झाल्याच्या चर्चा असताना प्रत्यक्ष काम सुरू होण्यास विलंब का होत आहे? प्रशासनाकडून कामाच्या सुरुवातीची आणि पूर्णत्वाची निश्चित तारीख जाहीर केली जाणार का? की नागरिकांनी आणखी काही महिने या खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करायचा?

प्रशासनाला थेट सवाल!

रस्त्याचे काम नेमके कधी सुरू होणार आणि कधी पूर्ण होणार? संभाव्य अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कधी होणार? लासलगावकरांना या धोकादायक रस्त्यावरून आणखी किती दिवस प्रवास करावा लागणार?

अपघात होण्याची वाट न पाहता प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 8 6 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे