Breaking
गुन्हेगारी

नैताळेत भरदिवसा गोळीबार; तरुण गंभीर जखमी

गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याची प्राथमिक माहिती; पोलिसांकडून तपास सुरू

1 4 3 3 4 0

न्यायभूमी

नैताळे दिनांक २६ नोव्हेंबर :विशेष वृत्त

निफाड तालुक्यातील नैताळे येथे गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गावातील पाण्याच्या टाकीजवळ दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.

प्राथमिक माहितीनुसार, गावठी कट्ट्यातून गोळी झाडण्यात आली. गोळीबारानंतर जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पाहणी केल्याची माहिती आहे.

गोळीबाराचे नेमके कारण, वापरण्यात आलेले शस्त्र आणि घटनेतील संबंधित व्यक्तींची भूमिका याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

या प्रकरणात कोणाला ताब्यात घेण्यात आले आहे का,याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

नैताळेसारख्या गावात भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांच्या तपासातून घटनेचे नेमके कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 3 3 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे