महाराष्ट्र
येवल्यात हॉटेलवर पोलिसांची धाड
शहरात खळबळ; हॉटेलच्या आडून सुरू असलेल्या गैरप्रकारांची सखोल चौकशी करण्याची गरज
1
4
1
6
8
9
न्यायभूमी
येवला |दिनांक २३ नोव्हेंबर विशेष वृत्त
येवला शहरातील एका हॉटेलमध्ये कथित अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आज धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
हॉटेलमध्ये नेमका कोणता प्रकार सुरू होता, या कारवाईत कोणाला ताब्यात घेण्यात आले आणि याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
हॉटेलच्या नावाखाली अवैध प्रकार सुरू असल्यास संबंधितांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
पोलिस तपासातून नेमके सत्य समोर येणार का? हॉटेलच्या कारभाराचीही सखोल तपासणी होणार का?

1
4
1
6
8
9



