Breaking
महाराष्ट्र

फिरत्या वाचनालयाचा २३वा वर्धापन दिन अनोख्या उपक्रमाने साजरा दिवाळीत वाचनसंस्कृतीचा प्रकाश घराघरांत पोहोचविण्याचा निर्धार

वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ ज्ञानाचा जागर संतोष पुंड यांचा वाचन चळवळ व्यापक करण्याचा संकल्प

1 3 8 9 8 6

न्यायभूमी 

 येवला दिनांक १८ नोव्हेंबर | प्रतिनिधी : एकनाथ भालेराव

अंदरसूल येथील आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त संतोष बाळनाथ पुंड यांनी दिवंगत वडील कै. बाळनाथ पुंड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ज्ञानदानाचा संकल्प करत आपल्या फिरते वाचनालय या उपक्रमाला नवी दिशा देण्याचा निर्धार केला आहे.

वाचनालयाचा २३वा वर्धापन दिन दिवाळी आणि निर्जला एकादशीचे औचित्य साधत त्यांनी वाचन चळवळ अधिक व्यापक करून ती गावोगावी आणि घराघरांत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला

पिठाची गिरणी सांभाळत स्वतःच्या कष्टातून पुस्तकांचा खजिना उभा करणारे संतोष पुंड गेली २३ वर्षे सायकलवरून वाचकांच्या दारापर्यंत पुस्तकांची शिदोरी पोहोचवत आहेत त्यांच्या संग्रहात तीन हजारांहून अधिक पुस्तके असून वाचकांना विनामूल्य वाचनाची संधी दिली जाते महापुरुषांची चरित्रे प्रेरणादायी साहित्य कथासंग्रह आणि वैचारिक पुस्तकांच्या माध्यमातून समाजात वाचनाची गोडी निर्माण करण्याचे त्यांचे कार्य सुरू आहे स्वामी परमानंद गिरीजी महाराज ऑनलाइन वाचनालयाच्या माध्यमातूनही हा ज्ञानप्रसार सुरू आहे.

वडिलांनी दिलेले प्रेम शिकवण आणि संस्कारांची शिदोरी जपत त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाला केवळ औपचारिक कार्यक्रमापुरते मर्यादित न ठेवता समाजात ज्ञानाचा प्रकाश वाढविण्याचा विचार पुंड यांनी मांडला आहे त्यांच्या वाचनसेवेची दखल घेत त्यांना ‘नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड २०२६ ने गौरविण्यात आले आहे

२२ नोव्हेंबरला प्रथम पुण्यस्मरण

कै. बाळनाथ पुंड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रविवार २२ नोव्हेंबर २०२६ रोजी अंदरसूल येथील नागेश्वर महादेव मंदिर तपोभूमी येथे आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे समस्त पुंड परिवार व आप्तेष्टांनी सर्व स्नेहीजनांना उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे

वडिलांच्या संस्कारांना कृतीची जोड आणि स्मृतींना वाचनसेवेचा उजाळा देत संतोष पुंड यांनी ज्ञानाचा दिवा अधिकाधिक घरांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 3 8 9 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे