लासलगाव ग्रामपंचायत सरपंच योगिता पाटील यांनी घेतली तातडीची दखल
लासलगाव मोकाट कुत्र्यांचा पंधरा ते वीस जणांना चावा
न्यायभूमी न्युज
लासलगाव दि १३ ऑगस्ट निशिकांत पानसरे

लासलगाव येथील मध्यवर्ती ठिकाण असलेले बस स्थानक या ठिकाणी एका युवकास पाच ते सहा कुत्र्यांनी हल्ला केला तसेच गणेश नगर परिसरातही आरोही जाधव या चिमुकली वर चावा घेत.मोकाट कुत्र्यांनी लासलगाव तसेच टाकळी विंचूर या भागात शाळकरी मुलांमध्ये व पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे.

आजूबाजूच्या नगरपालिकांमधून रात्री गाड्यांमध्ये मोकाट कुत्रे सोडले जातात अशी लासलगाव येथील नागरिकांचे मत आहे.
लासलगाव ग्रामपंचायत ने या वर लवकरात लवकर काही तोडगा काढावा.
अशी मागणी लासलगाव परिसरातून होत आहे लासलगाव सरपंच योगिता पाटील यांनी या गोष्टीची तातडीने दखल घेत ग्रामीण रुग्णालय येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून डॉग बाईट ची लस सध्या उपलब्ध असून त्याला जोड देण्यात येणाऱ्या लसी चा साठा उपलब्ध नसल्यामुळे ग्रामपंचायत सरपंच योगिता पाटील व योगेश पाटील यांनी तातडीने लस मागवली आहे.

सदरील चिमुकली नागरिकांवर लासलगाव ग्रामीण रुग्णालयात येथे प्राथमिक उपचार देण्यात आले आहे.



