Breaking
क्रिडा व मनोरंजन

नाशिक जिल्ह्यात आशियाई स्पर्धां मधील सायकलिंग मध्ये निवड होणारा योगेश हा पहिलाच विद्यार्थी

ताहाराबाद विद्यालयातील योगेश सोनवणे याची चीनमधील आशियाई स्पर्धांसाठी निवड

0 8 9 9 8 8

न्यायभूमी न्यूज 

ताहाराबाद – दि ०८ एप्रिल  विशेष प्रतिनिधी

ताहाराबाद येथील मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज,ताहाराबाद विदयालयातील विद्यार्थी योगेश नामदेव सोनवणे याने हरियाणा मधील मोरणी हिल्स येथे 21 व्या सिंनियर, ज्युनियर व सब ज्युनिअर राष्ट्रीय माउंटन बाईक सायकलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्रातर्फे सायकलिग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मार्फत खुल्या गटात वैयक्तिकरित्या भाग घेऊन दुसरा क्रमांक पटकावून कांस्य पदक मिळविले. तसेच योगेशने महाराष्ट्र संघाकडून टीम प्रकारात रौप्य पदक मिळविले.

दोन पदकांच्या प्राप्तीमुळे 2025 मध्ये चीन येथे होणाऱ्या आशियाई खेळासाठी योगेशची निवड झालेली आहे.

संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आशियाई स्पर्धांमधील सायकलिंग मध्ये निवड होणारा योगेश हा पहिलाच विद्यार्थी आहे.

अतिशय खडतर आणि गरीब परिस्थितीचा सामना करत योगेशने हे यश प्राप्त केले आहे.

त्याच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेची कमी नसून फक्त संधीची गरज आहे ही गोष्ट दिसून आली.

ग्रामीण भागातील योगेशच्या सायकलिंग मधील यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल यात शंका नाही.

योगेशच्या या यशाच्या निमित्ताने ताहाराबाद विद्यालयातर्फे प्राचार्य दिपक डावरे, उपमुख्याध्यापिका श्रीमती आर.आर सोनवणे, पर्यवेक्षक श्री बी.एस जगताप,उप- प्राचार्य एस. आर. देशमुख क्रीडा शिक्षक जी. टी.आहेर व विद्यालय परिवारातर्फे योगेशचा सत्कार करण्यात आला.

योगेशच्या भावी वाटचालीसाठी मविप्र संस्थेचे सरचिटणीस अँड.नितीनजी ठाकरे, चिटणीस मा.दिलीपजी दळवी, बागलाण तालुका संचालक डॉ.प्रसाददादा सोनवणे, तालुका महिला संचालिका श्रीमती शालनताई सोनवणे , शालेय समिती अध्यक्ष डॉ. प्रशांतदादा सोनवणे व विलासबापू निकम यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

याप्रसंगी जुनियर कॉलेजचे व्ही. डी.जाधव, ए. एम. ठाकरे, डी. डी. चौधरी, एस. जे. गांगुर्डे, एस. आर. कुटे, व्ही. व्ही. विंचुरकर, आर. डी. पैठणे, एस. जी. मोरे, अभिजीत गोसावी,भरतगीर गोसावी, आनंद सैंदाणे,व्ही. एस. निकम, एन. डी. सोनवणे, पी. एस. धोंडगे आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित गोसावी यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे