Breaking
महाराष्ट्र

डोंगरगाव येथील माध्यमिक शाळेत ज्येष्ठ साहित्यिक सचिन होळकर यांचे व्याख्यान संपन्न

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 0 0 0 1

न्यायभूमी

लासलगाव दि.१५ डिसेंबर निशिकांत पानसरे

व्ही.एन.नाईक शिक्षण प्रसारक मंडळाची निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथील माध्यमिक शाळेमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे व्याख्यानमालेचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावर्षीच्या कार्यक्रमांमध्ये व्याख्याते म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक,कृषीतज्ञ,लेखक सचिन आत्माराम होळकर यांचे व्याख्यान संपन्न झाले. होळकर यांनी त्यांच्या व्याख्यानातून गोपीनाथराव मुंडे यांच्या जीवनातील संघर्ष अधोरेखित केला.

त्याचप्रमाणे सध्याची राजकीय परिस्थिती आणि या परिस्थितीत मुंडे साहेबांची उणीव जाणवत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

भारतीय लोकशाहीचे महत्त्व, सध्याचे राजकारण,त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी आरोग्य आणि शिक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धती, शेतकऱ्यांचे वाद विवाद यावर देखील होळकर यांनी प्रकाश टाकला.

व्याख्यानात त्यांनी अनेक बोधकथा,कविता, अभंग आणि विनोद त्यांनी सादर केले.होळकर यांचे व्याख्यान हे शेतकरी,विद्यार्थी,राजकारणी, महिला या सर्वांना उपयुक्त ठरेल असे होते.

अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी सचिन होळकर यांच्या समवेत प्रमुख पाहुणे म्हणून लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे, ज्येष्ठ पत्रकार डी.बी.कादरी,कार्यक्रमाचे अध्यक्ष व्हि.एन नाईक संस्थेचे विश्वस्त अशोक नागरे,डॉ. भाऊराव सांगळे,प्रकाश काकड, व्हि.जे.आघाव, केशव आघाव त्याचप्रमाणे ग्रामस्थ, शेतकरी, शिक्षक,कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी महापुरुषांना अभिवादन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली तसेच कबड्डी स्पर्धेमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या रांगोळ्यांचे मान्यवरांनी परीक्षण केले.विद्यार्थ्यांकडून यावेळेस स्वागत गीत,लेझीम पथक तयार करून पाहुण्यांचे स्वागत केले.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे