एस.बी.आय बँकेच्या विरोधात सुरू असलेले मनोहर बोचरे यांचे उपोषण स्थगित
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या मध्यस्थीनंतर उपोषणकर्ते मनोहर बोचरे यांचे उपोषण मागे
न्यायभूमी न्यूज
नासिक (लासलगाव) दि २५ जून विशेष प्रतिनिधी बाबा गिते

भारतीय स्टेट बँक शाखा लासलगाव व एस.बी.आय जनरल इन्शुरंन्स कंपनी लिमिटेडच्या अनागोंदी कारभारा विरोधात लासलगाव येथे सामाजिक कार्यकर्ते मनोहर बोचरे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी उपोषण स्थळी भेट दिली.
त्यानंतर संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणली. यावेळी २० दिवसांत इन्शुरन्स संदर्भात सर्व प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासन बँकेच्या वतीने देण्यात आले.
त्यानंतर प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते पाणी घेऊन मनोहर बोचरे यांनी आपले उपोषण स्थगित केले.
भारतीय स्टेट बँक शाखा लासलगाव व एस.बी.आय जनरल इन्शुरंन्स कंपनी लिमिटेङ नाशिक शाखा यांच्या अनागोंदी कारभारा विरोधात लासलगाव येथे मनोहर भाऊ बोचरे यांचे ठिय्या आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत
राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी उपोषण स्थळी भेट देत बँकेचे अधिकारी व मनोहर बोचरे यांच्या सकारात्मक चर्चा घडवून आणली.
यावेळी स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक मनीष रामटेके यांनी वरिष्ठ स्तरावर संपर्क करून आंदोलनातील मागण्या बाबत सकारात्मक चर्चा करीत वीस दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर मनोहर बोचरे यांनी आपले उपोषण स्थगित केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर,शाखा अधिकारी मोहित सोनार, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कररावजी शिंदे,लासलगाव बाजार समितीचे संचालक डॉ.श्रीकांत आवारे,माजी पंचायत समिती सभापती शिवाजी सुरासे,अशोक नागरे, गोरख शिंदे,विनोद जोशी,पांडुरंग राऊत,बालेश जाधव,डॉ.विकास चांदर,संतोष पानगव्हाणे, बाळासाहेब पुंड,सचिन होळकर,धनजय जोशी, अशोक बोचरे,राजेंद्र मेमाणे,विनायक बोचरे, रवींद्र बोचरे,ज्ञानेश्वर आरोटे,राजेंद्र कांबळे,योगेश बोचरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.



