Breaking
गुन्हेगारी

निफाड तालुक्यातील देवगाव फाटा परिसरात चोरट्यांनी चक्क सहा शेळ्या-बोकडांवर डल्ला

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 5 1 4 4

न्यायभूमी न्यूज 

देवगाव दि ०९ ऑगस्ट प्रतिनिधी अजीज काद्री 

 देवगाव फाटा परिसरात चोरट्यांनी चक्क सहा शेळ्या-बोकडांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या चोरीत शेतकऱ्याचे तब्बल ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

       दि. ४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ ते २ या वेळेत फिर्यादी सौ.द्रोपदाबाई बाजीराव शिंदे, वय ६०,धंदा शेती,रा.देवगाव फाटा यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या शेळ्या – बोकडांवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला.

 या घटनेत तीन वर्षांच्या चार व दोन वर्षांच्या दोन अशा एकूण सहा शेळ्या-बोकड चोरून नेण्या आल्या.

घटना घडली तेव्हा सर्व कुटुंबीय झोपेत होते. शेडची बाजू उघडून चोरट्यांनी प्राण्यांना बाहेर काढले व अंधाराच्या आडून पसार झाले.

सकाळी फिर्यादींना शेळ्या – बोकड दिसत नसल्याचे लक्षात येताच परिसरात शोध घेतला असता,शेळ्यांचा काहीच मागमूस लागला नाही.

   या चोरीमुळे शिंदे कुटुंबावर आर्थिक टंचाईचे सावट आले आहे. शेळ्या व बोकड हे त्यांच्या उपजीविकेचा महत्त्वाचा आधार होता. चोरट्यांच्या या कृत्याने देवगाव फाटा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

   याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गु.र. नं. १९३/२५,भा.दं.वि.कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून,स.पो.नि. भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा.संदीप शिंदे अधिक तपास करीत आहेत.

2.7/5 - (3 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 1 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे