ओझर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सहाय्यीका भारती कदम सेवानिवृत्त..
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
ओझर : दि ३० जून प्रतिनिधी / उत्तम गारे
प्राथमिक आरोग्य केंद्र ओझरच्या आरोग्य सहायिका भारती मुरलीधर कदम ह्या ३४ वर्ष आरोग्य सेवा देत नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या.
सेवा कालावधीत त्यांनी वडनेरभैरव,मोहाडी, ओझर येथे सेवा केली.त्यांनी आरोग्य सेवेत माता बालसंगोपन,पल्स पोलिओ लसीकरण,मिझल रुबेला, कोरोना काळात विशेष सेवा दिल्या.

प्रा आ के ओझरला कायाकल्प पुरस्कारासाठी त्यांचा महत्वाचा वाटा आहे.अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हर्षल नेहते,डॉ युवराज देवरे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुजित कोशिरे,पिंपळगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉ वैशाली कदम,डॉ धनवटे,ओझरचे वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद सुर्वे,डॉ प्राची पवार,फार्मसी ऑफिसर सुमती ठाकूर,हिवताप पतसंस्था विद्यमान संचालिका पल्लवी कुलकर्णी,तालुका सुपर वायजर आरिफ पठाण सर,सानप नाना, शिरसाट सिस्टर,आरोग्य सहायक अनिल राठी, रविंद देवरे,आशा गटप्रवर्तक कावेरी कदम, संगीता गाडे,सर्व आशा तसेच ओझरच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी यानिमित्त भावी वाटचालीस भारती कदम यांना शुभेच्छा दिल्या.