आरोग्य व शिक्षण
जनता विद्यालयात नशा मुक्त युवा-विकसित भारत संकल्प अभियानांतर्गत नशा मुक्त प्रतिज्ञा संपन्न
1
1
5
6
5
8
न्यायभूमी
चादवड दि.०३ ऑगस्ट सहसंपादक सुनील पोळ
मराठा विद्या प्रसारक समाज संस्था नाशिक संचलित जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि अभिनव बालविकास मंदिर वडाळी भोई येथे आज सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी देशव्यापी सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत नशा मुक्त प्रतिज्ञा सामूहिकरित्या घेण्यात आली.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगीता सोनवणे यांच्या मार्गदर्शनानुसार कु वैष्णवी आहेर हिच्या समवेत संपूर्ण शालेय परिवाराने या नशा मुक्त शपथ उपक्रमामध्ये सहभाग नोंदविला.

अमली पदार्थांच्या सेवनाविरुद्ध 100 आठवडे चालणाऱ्या या जनआंदोलन मोहिमेचा उद्देश समाजामध्ये जनजागृती करणे हा आहे.
1
1
5
6
5
8


