आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त जनता विद्यालयात विद्यार्थ्यांचे जनजागृती पर पथनाट्य
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील
न्यायभूमी न्यूज
वडाळीभोई दि.०९ सप्टेंबर सहसंपादक सुनील पोळ

येथील मविप्र समाज संस्था नाशिक संचलित जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि अभिनव बाल विकास मंदिर वडाळीभोई येथे आज सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध उठाव करणारे आणि महाराष्ट्रात स्वातंत्र्यलढ्याची मुहूर्तमेढ रोवणारे भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातील अग्रगण्य योध्ये राजे उमाजी नाईक यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ संगीता सोनवणे त्याचबरोबर ज्येष्ठ शिक्षक श्री सूर्यभान वडक्ते,श्री मोहन यशवंते श्रीम वैशाली पवार, श्रीम वैशाली चौरे यांनी आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण केली तर उपस्थित सर्वांनीच प्रतिमेचे पूजन केले.
यानंतर शालेय विद्यार्थिनी कु अनन्या जाधव हिने आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांचा जीवन परिचय व कार्य यांविषयी माहिती दिली तर शिक्षक मनोगतातून श्री घनश्याम झुटे यांनी उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढलेल्या अनेक लढाया व उठाव यांविषयी माहिती दिली.
यावेळी अभिनव बालविकास मंदिर व माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.



