Breaking
महाराष्ट्र

टाकळी विंचूर येथे चोवीस वर्षीय तरुणीचा झोपेत मृत्यू सविस्तर वृत्त

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 2 0 9 7

न्यायभूमी न्यूज 

निफाड (लासलगांव )दि १७ मार्च तालुका प्रतिनिधी जनार्दन चव्हाण 

  टाकळी विंचुर ता.निफाड येथील कल्याणी केशव मोकाटे हिचा झोपेत मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून याबाबत लासलगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

       याबाबत गणेश सुरेश कापसे, रा.संधाननगर टाकळी विंचुर यांनी खबर दिली की, त्यांची बहीण कल्याणी केशव मोकाटे वय २४ हि दि.१५ मार्च रोजी रात्री ११ वा.सुमारास तिचे राहते घरात झोपली असता ती सकाळी ८ वा.पावेतो झोपेतुन उठली नाही म्हणुन तिला तिचे आईने आवाज दिला असता, तिने काही एक प्रतिसाद दिला नाही.

गावातील डॉ.सचिन जांगडा यांनी तिला तपासून ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगितले.

शिवा सुरासे व तिचे आई वडील यांनी खाजगी रुग्णवाहिकेतुन ग्रामीण रुग्णलयात नेले असता डॉ.यादव यांनी मयत घोषित केले. याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक तपास स.पो.नि.भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा.उत्तम गोसावी अधिक तपास करीत आहेत.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 0 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे