घोटी जनता विद्यालयात पालक -शिक्षक मेळावा संपन्न
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
सिन्नर दि.१२ ऑगस्ट प्रतिनिधी सोमनाथ गिरी
मराठा विद्या प्रसारक समाज संचलित घोटी येथील जनता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात पालक -शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न झाला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिवराम झोले होते.
व्यासपीठावर शालेय समितीचे अध्यक्ष मनोज जाधव,उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, जि. प.माजी बांधकाम सभापती
अलकाताई जाधव,शालेय समिती सदस्य नरेंद्र मेधने ,दीपाताई कंदकुरीवार, वैशालीताई गोसावी, गोरख गव्हाणे,विद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पगारे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते अखंड भारताचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज व विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
विद्या जाधव, शोभा भटाटे आदींसह इतर पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना व झालेल्या चर्चेला प्राचार्य रवींद्र पगारे यांनी समर्पक उत्तरे दिली. या उत्तरांनी उपस्थित पालकांनी समाधान व्यक्त केले . यावेळी बोलताना प्राचार्य रवींद्र पगारे म्हणाले की, पालकांनी शाळेला वेळ देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हातभार लावावा. शाळेच्या प्रगतीसाठी पालक व शिक्षकांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगतीसाठी पालकांची जबाबदारी सुद्धा महत्त्वाची आहे.असे प्राचार्य श्री. पगारे म्हणाले.यावेळी अलका जाधव,दीपा कंदकुरीवार, वैशाली गोसावी, गोरख गव्हाणे यांनी आपल्या मनोगततून सांगितले की,आईने मुलींवर चांगले संस्कार करून मुलींची जबाबदारी घेतली पाहिजे.कोणत्याही पालकांनी विद्यार्थ्यांना मोबाईल देऊ नये असे आवाहन केले.
शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या शिस्त, गुणवत्तावाढीसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार आहे. सर्व ग्रामस्थांनी शाळेतील उल्लेखनीय बाबींचे, विविध उपक्रमांचे व शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात माजी आमदार शिवराम झोले म्हणाले की, शाळेला येणाऱ्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी पालकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वांनी मिळून सामूहिक प्रयत्न करावे.
जेष्ठ शिक्षक सोमनाथ गिरी यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यालयातील विविध उल्लेखनीय उपक्रमांची माहिती पालकांना देवून सूत्रसंचालन केले तर आभार रमेश देवगिरे यांनी मानले.



