Breaking
महाराष्ट्र

संविधान दिनानिमित्त कुणाल दराडे फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; मुक्तिभूमी येथे वाहिली मानवंदना

1 4 4 8 6 9

न्यायभूमी 

येवला :दिनांक २७  नोव्हेंबर 

भारतीय संविधानाच्या ७७ व्या संविधान दिनानिमित्त कुणाल दराडे फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे यांनी येवला शहरातील विंचूर चौफुली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

तसेच ऐतिहासिक मुक्तिभूमी येथे भेट देत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण केली.

यावेळी भारतीय संविधानाने देशाला दिलेली समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता ही मूल्ये जपण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. संविधान हे प्रत्येक भारतीयाच्या हक्कांचे आणि लोकशाहीचे मजबूत अधिष्ठान असून, त्याचा सन्मान व लोकशाहीचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याची भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आली.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख विशाल परदेशी, शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे सुभाष गांगुर्डे, समर्थ अलगट, विजय मोरे, मोफीज अत्तार, रवी खैरनार, सुनील खडके यांच्यासह शिवसैनिक व इतर सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 8 6 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे