लासलगाव येथील लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँकेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
‘वर्षातील सर्वोत्तम बँक’ आणि ‘उत्कृष्ट डिजिटल बँकिंग’ पुरस्कारांनी सन्मानित

न्यायभूमी
लासलगाव :दिनांक २८ नोव्हेंबर
लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि., लासलगाव हिला राष्ट्रीय सहकारी बँक कार्निव्हलमध्ये दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले. ‘वर्षातील सर्वोत्तम बँक’ आणि ‘उत्कृष्ट डिजिटल बँकिंग पुरस्कार’ असे दोन सन्मान बँकेला प्रदान करण्यात आले.

सहकारी बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य, सक्षम प्रशासन, विश्वासार्ह ग्राहकसेवा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर बँकेला हा गौरव मिळाल्याचे बँकेच्या माहितीतून सांगण्यात आले.

या सोहळ्यात बँकेचे मार्गदर्शक शंतनूदादा पाटील, संचालक मंडळाचे सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक धात्रक उपस्थित होते. त्यांनी बँकेच्या वतीने पुरस्कार स्वीकारले.

या यशाबद्दल बँकेचे चेअरमन नानासाहेब पाटील, व्हाइस चेअरमन डॉ. सुरेश दरेकर, संचालक मंडळ, अधिकारी-कर्मचारी, सभासद आणि ग्राहकांकडून अभिनंदन होत आहे. या पुरस्कारांमुळे बँकेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

