Breaking
नोकरी

लासलगाव येथील दिवाळीत उजळवले निराधार व्रध्द महिलेचे घर….! वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी फेडले आपुलकीचे कर

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

लासलगांव दि ०१ नोव्हेंबर 

ज्या वयात कुटुंबांचा सहवास हवा हवासा वाटतो त्यात कोणीच नसणे या शिवाय वाईट परिस्थिती काहीच नाही.

पती वारले, पोरगा सोडून गेला, एक मुलगी ती तिच्या सासरी अश्यात जीवन जगणे साठी संघर्ष करत असलेली एक कुचेकर आजी लासलगाव मध्ये मिळेल ते काम करते आणि आपला एकटीच उदरनिर्वाह करते.

पोरा मुळे विज बिलाची थकबाकी वाढली होती आणि घरातील असलेलं मीटर 2 वर्षे पूर्वी कट झाले होते.

अश्यात घरात लाईट लागावी म्हणून 500 रुपये घेऊन महावितरणच्या कार्यालयात आजी पोहचली.

परंतु कायमस्वरूपी थकबाकी होती रु 3440/-. मग अश्यात आजीला महावितरण लासलगाव येथे असलेले सहाय्यक अभियंता श्री अजय सावळे साहेब भेटले, त्यांनी आजीला सांगितले की रु 500 बिला मध्ये भरता येणार नाही, आणि वीज सुद्धा जोडता येणार नाही, मग आजी म्हणाली को, ” ठीक आहे आता रु 500 घ्या दिवाळी नंतर रु 2000 देते, दिवाळी अंधारात च जाईल माझी”.

मात्र हे ऐकून आजी ची परिस्थिती बघून सावळे साहेबांनी वरिष्ठ तंत्रज्ञ, श्री शशिकांत जाधव ह्यांच्या कडून पूर्ण माहिती घेतली.

आजीचे नाव : शकुंतला पांडुरंग कुचेकर,अंदाजे वय ७२ राहणार पिंजर गल्ली,लासलगाव असे आजीचे नाव आजीची पूर्ण बिल भरण्याची परिस्थिती नाही हे लक्षात आले होते.

मग महावितरणच्या चांदवड विभागाचे कार्यकारी अभियंता मा.श्री केशव काळू माळी साहेब आणि लासलगाव ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता मा श्री ज्ञानेश्वर बागुल साहेब ह्यांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू असलेल्या “महावितरण अभय योजना 2024” मध्ये आजीचे थकबाकी वरती 10% सूट देऊन रु. 2720 /- इतकी रक्कम स्वतः सावळे साहेब ह्यांनी भरून आजीकडून कागदपत्रे घेऊन नवीन मीटर सह वीज कनेक्शन देण्याचे ठरवले.

वरिष्ठ तंत्रज्ञ, श्री सुदर्शन शिंदे, ह्यांनी आजीचे कागदपत्रे ऑनलाइन दाखल केले, त्यानंतर तिला आलेले कोटेशन श्री सावळे साहेब ह्यांनी भरून, महावितरण कडे असलेली सर्व्हिस वायर व इतर साहित्य सहित आजीला दिवाळीच्या 2 दिवसा अगोदरच सर्व कर्मचारी मिळून ह्यांनी वीज कनेक्शन करून दिले.

तसेच आजीच्या घरात लाईट नव्हता तर महावितरण कर्मचाऱ्यांनी स्वतः खर्चाने led बल्ब आणून आजीच्या घरात प्रकाश केला.

यावेळी महावितरण लासलगाव शहर कक्षाचे सर्व कर्मचारी, शशिकांत जाधव, हरीश भागवत, समाधान साठे, सुदर्शन शिंदे,किरण देवरे,राजेंद्र कोळी,जनार्धन म्हस्के, राजेंद्र केदारे,दीपक जाधव,प्रतीक घुमरे,विशाल गोरे इत्यादी उपस्थित होते.

घरात बरेच दिवसांनी लाईट लागलेला पाहून कुचेकर आजीच्या डोळ्यात आनंद अश्रू आलेत हे पाहून अधिकारी आणि सर्व कर्मचारी ह्यांनी खरे समाधान मिळाले.

3.5/5 - (2 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे