0
9
2
0
9
7
न्यायभूमी न्यूज
खडक माळेगाव दि ०४ सप्टेंबर राजेंद्र जाधव
खडक माळेगाव धरणावर प्रथमच किमान शंभरच्या आसपास फ्लेमिंगो (रोहित ) पक्षी आढळून आले.हे अनोखी पक्षी बघण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

पक्षी प्रेमींसाठी ही आनंदाची बाब आहे हे पक्षी नांदूर मधमेश्वर धरणावर असत पण त्यांनी खडक माळेगाव धरणावरही पसंती दिली गुलाबी रंग,उंच मान,लांब असे पाय असलेले हे फ्लेमिंगो पक्षी एक ते दीड मीटर उंच आणि दोन ते चार किलो वजनाचे असतात ते साधारण 50 ते 60 किलोमीटर वेगाने प्रवास करू शकतात पाण्यातील किडे हा त्यांचा मुख्य विशेष आहार असल्याने हे पक्षी पाणथळ जागेतच राहणे पसंत करतात.
खूपच सुंदर गुलाबी रंग असलेले पक्षी प्रथमच खडक माळेगाव धरणात आल्याने या अनोख्या पाहुण्यांचा स्थानिकांनी व पक्षी प्रेमींनी फोटो काढून आनंद घेतला.
0
9
2
0
9
7


