Breaking
महाराष्ट्र

डॉ व्हर्गीस कुरियन यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा 

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 8 8

न्यायभूमी

चादवड दि.२७ नोव्हेंबर सुनील पोळ 

        २६ नोव्हेंबर हा दिवस धवल क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ व्हर्गीस कुरियन यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने मनमाड येथील आईसाहेब दूध संकलन व शीतकरण केंद्रावर मोठ्या उत्साहात आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी मनमाड,नाशिक,नांदगाव विभागातील दूध संकलन व शीतकरण केंद्र चालकांच्या उपस्थित पार पडला. 

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुमुल डेअरीचे महाराष्ट्र हेड विशाल सोळंकी यांनी आपल्या मनोगतात डॉ व्हर्गीस कुरियन यांनी कशा पद्धतीने दूध क्षेत्रात क्रांती घडवून आणली तसेच सहकार क्षेत्र कसे मजबूत केले यावर सखोल मार्गदर्शन केले.

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाचे राष्ट्रीय मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील पोळ शेतकऱ्यांना दूध संदर्भातील अडचणींचा सामना कसा करावा यावर मार्गदर्शन करत शेतकऱ्यांचे मनोबल उंचावले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक महेश गरुड, पत्रकार नरहरी उंबरे,आय सी आय सी आय बॅंकचे मॅनेजर भरतसिंग परदेशी,दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे