आरोग्य व शिक्षण
डुबेरे येथील शाहू किड्स अकॅडमीमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
0
8
9
9
9
4
न्यायभूमी न्यूज
सिन्नर दि 24 फेब्रुवारी अभय पाटील :-

डुबेरे येशील एन.के.वाजे फाउंडेशन संचलीत शाहू किड्स अकॅडमी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
विद्येची देवता सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. विविध परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देवून गौरविण्यात आले.
दूधडेरी चे संचालक सुनील प्रभाकर वाजे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केल्या.

यावेळी एन.के .फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश वाजे, उद्योजक राम वारुंगसे ,शाळेच्या प्राचार्य सोनाली माळी, ज्योती वाजे ,पालक अंजली काटे
आदींसह विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
0
8
9
9
9
4


