नाशिक येथे सकल मराठा परिवार तर्फे आयोजित रक्तदान शिबिर संपन्न
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
नासिक दि १७ फेब्रुवारी मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

सकल मराठा परिवार नाशिक टीम ही नेहमी समाज कार्य करत असते सद्याच्या परिस्थितीत रक्ताचा तुटवडा जाणवत असून, अशा वेळी रक्तदात्यानी पुढं यावे अशी हाक राज्य संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य यांनी दिली त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत सकल मराठा परिवार नाशिक टीम ने या मानवतेच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद देत,माणुसकीचा झरा या भावनेतून नाशिक सकल मराठा परिवारा तर्फे छत्रपति शिवाजी महाराज चौक, श्री साई हॉस्पिटल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात १३२ रक्तदाते यांनी आपले रक्तदान केले.या शिबिरासाठी शिवजन्मोत्सव समिती तसेच डॉक्टर मिलिंद पवार यांचे योगदान लाभले तर मराठा विद्या प्रसारक यांच्या रक्तपेढीचे सहकार्य भेटले या शिबिराची सुरवात लग्न मंडपातून येत नवदाम्पत्य श्री प्रविण त्र्यंबक सोनवणे व तृप्ती विठ्ठल सरपत यांनी सोबतच नव जीवनातील पाहिले रक्तदान केले.
रवींद्र पदाडे माजी सैनिक यांनी ७२ व व विरेंद्र सिंग ठाकूर , गिरीश पाटील माजी सैनिक यांनी पण रक्तदान केले या शिबिरात अनेक बांधवां सोबत महिला बगीनी यांनी सहभाग घेतला.
अनेक रक्तदाते रक्तदानास येऊनही काही वैयक्तिक अडचणी मुळे रक्तदान करू शकले नाही हे शिबीर यशस्वी होण्यास सकल मराठा परिवार ग्रुप चे सर्व सदस्य यांनी मनस्वी प्रयत्न केले.
तसेच शिवजन्मोत्सव समिती व डॉक्टर मिलिंद पवार यांचे महत्वाच सहकार्य लाभले.



