न्यायभुमी
नासिक दि.२० मार्च रोशन गव्हाणे

अनेक महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्याच्यांवर अत्याचार करणाऱ्या लिंगपिसाट अशोक खरात यांच्याशी संबंध असणाऱ्या चाकणकरांनी नैतिकतेला धरून राजीनामा द्यावा.
अशी मागणी नाशिक भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष अनिता भामरे यांनी केली आहे.
जागतिक महिला दिनी व्यासपीठावरून बाबासाहेबांच्य संविधानाचे महत्त्व सांगणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी तरी संविधान वाचले की नाही ही शंका येते.
महिलांना चार वाट्या,पाच तांट,दोन चमचे सासरी जातांना देण्यापेक्षा संविधानाची प्रत द्या हे केवळ बोलून चालणार नाही तर खरे मनात उतरवावे लागेल.
बाबासाहेबांचा मूळात कर्मकांडावर विश्वास नव्हताच याउलट मात्र चाकणकरांचे वर्तन दिसून येते.
नाशिक पोलिसांनी मोठ्या शिताफीने लिंगपिसाट अशोक खरातला अटक केली आहे.पोलीस त्याची चौकशी करतीलच परंतू चाकणकरांची आणि खरातांची जवळीक पाहता अडथळा येऊ शकतो.
चाकणकरांचे व लिंगपिसाट अशोक खरातचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मिडियासमोर आल्याने शासनाचा महिला आयोग बदनाम होत आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करत चाकणकरांनी नैतिकतेला धरून राजीनामा द्यावा अन्यथा राज्यातील महिलांना राजीनामा घेण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.