Breaking
आरोग्य व शिक्षण

प्रणाली आहेरने पटकावला तालुक्यात ८ वा क्रमांक;जि.प.शाळा,वादची शिष्यवृत्ती यशाची परंपरा कायम…!!

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

1 1 8 3 0 9

न्यायभूमी

चांदवड दि.०४ जुलै 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांच्या वतीने आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी)–२०२६ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,वाद ने दैदिप्यमान यश संपादन करत गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.शाळेतील विद्यार्थिनी प्रणाली प्रविण आहेर हिने २१० गुण मिळवत चांदवड तालुक्यात ८ वा क्रमांक पटकावून शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान मिळवला आहे.

यावर्षी शाळेतील एकूण ९ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसले होते.त्यापैकी तब्बल ६ विद्यार्थी पात्र ठरले असून ६६.६७% निकालासह चांदवड तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत शाळेने यशाचा नवा मानदंड निर्माण केला आहे.

विशेष म्हणजे,इयत्ता पाचवीचे ३ विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत अत्यल्प गुणांनी अंतिम निवडीपासून वंचित राहिले.

सलग दुसऱ्या वर्षी शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर उल्लेखनीय यशाची परंपरा कायम राखली आहे.यापूर्वी सन २०२५ मध्ये याच शाळेतील विद्यार्थिनी सायली भाऊसाहेब आहेर हिने तालुक्यात ९ वा क्रमांक मिळवत शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान मिळवला होता.

त्यामुळे जि.प.शाळा,वाद ही शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी घडविणारी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखली जाणारी शाळा म्हणून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

या उल्लेखनीय यशामागे वर्गशिक्षक श्री.दिनेश बापू खैरनार यांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन,मुख्याध्यापक श्री.संतोष रावबा खरात यांचे प्रभावी नेतृत्व,तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सदस्य,पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या यशाबद्दल सर्व स्तरांतून विद्यार्थी,शिक्षक व शाळेचे अभिनंदन होत आहे.

2/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 8 3 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे