विंचूर येथे विविध ठिकाणी ७९ वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
न्यायभूमी न्युज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विचूर दि १६ ऑगस्ट अभय पाटील

विंचूर – देशाच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विंचूर गावात देशभक्तीच्या वातावरणात विविध ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय,ग्रामपंचायत कार्यालय तसेच नेहरू चौक येथे स्वतंत्रपणे ध्वजारोहण करण्यात आले.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात स्थानिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष जगदीश काका जेऊघाले यांच्या हस्ते ध्वज फडकावण्यात आला.
तसेच विद्यालयातील स्काऊट गाईड चे ध्वजारोहण उपाध्यक्ष कैलासजी सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत,कवितांच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व व्यक्त केले.
तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या माझी विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवारांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सचिन रत्नाकर दरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य,अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

नेहरू चौक येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत
ग्रामपंचायत सदस्य संतोषजी जाधव यांच्या हस्ते ध्वज फडकावण्यात आला.देशाच्या एकतेचा आणि प्रगतीचा संकल्प यावेळी सर्वांनी केला.
संपूर्ण गावात सकाळपासून देशभक्तीपर गाणी, सजावट व तिरंग्यांच्या फडफडीमुळे वातावरण भारावून गेले होते.



