Breaking
आरोग्य व शिक्षण

मानवस्पर्श सेवाभावी संस्थेच्या वतीने ऊसतोडणी कामगार महिलांना स्वेटर वाटप

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 9 4

न्यायभूमी न्यूज 

लासलगाव दि १८ डिसेंबर प्रतिनिधी निशिकांत पानसरे 

मानवस्पर्श सेवाभावी संस्था, लासलगाव या सामाजिक संस्थेच्या वतीने नांदूरमध्यमेश्वर गावात ऊसतोडणी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना स्वेटर वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सोमनाथ वाघचौरे साहेब (अप्पर पोलीस अधिक्षक, S.R.P.F., दौंड) यांनी भूषविले.

गावचे सरपंच दीपक ईकडे यांच्याहस्ते साहेबांचा सत्कार करण्यात आला.
*कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रा. सुनिल देवढे सर यांनी केले संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध सामाजिक उपक्रम व संस्थेची वाटचाल याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सोमनाथ वाघचौरे साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन करतांना ऊसतोडणी कामगार महिलांना भावी पिढीला शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे असून प्रत्येकाने आपल्या मुलांना शाळेत पाठवून त्यांना शिक्षणाची संधी द्यावी असे आवाहन केले तसेच, महिलांचे समाजातील उल्लेखनीय कार्य,त्यांचा संघर्ष यातून कुटुंबाची प्रगती होत असते त्यामुळे महिलांना येणाऱ्या अडचणी समाजाने विचारात घेऊन त्या सोडविणे प्राधान्याने महत्वाचे आहे असे प्रतिपादन केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष केशवराव जाधव, सचिव प्रा. सुनिल देवढे सर,खजिनदार सूर्यकांत जाधव, विश्वस्त प्रा. अरुण देवढे सर,समीर देवढे सर, गणेश महाले सर ,धनंजय वाघचौरे उपस्थित होते.
*संस्थेने २०१६ पासून “मानवसेवा हीच ईश्वरसेवा” हे ब्रीदवाक्य घेऊन विविध सामाजिक उपक्रम राबविले असून शहिद जवान कुटुंब, समाजातील गरीब, दिव्यांग,गरजू व्यक्ती, दिपावली फराळ वाटप, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्य, कोरोनाग्रस्त रुग्ण, अमरधाम स्वच्छ्ता व दीपोत्सव , वयोवृद्ध निराधार दांपत्य यांना मदत करण्यात आली.

मानवाला दुःखातून सावरण्यासाठी आधार देण्याचे कार्य संस्थेच्या वतीने अविरतपणे सुरू आहे. आजपर्यंत संस्थेच्या वतीने १५ ऑगस्ट २०२१ पासून २३ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलेले आहे.

या सामाजिक उपक्रमासाठी अनंत सोमवंशी(अमेरिका), ज्ञानेश्वर शिंदे(पुणे), कार्याध्यक्ष ऍड.सुनिल वाघचौरे, विश्वस्त ज्ञानेश्वर देवढे, सुरेखा देवढे, सोपान जाधव, सभासद गोरख देवढे सर, प्रताप आढाव सर,सचिन शेलार सर, नवनाथ कोकणे, कल्पना परब मॅडम यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

कार्यक्रमास गावचे सोसायटी चेअरमन रामदास शिंदे, सदस्य किरण उबाळे,दशरथ शिंदे,संजय उबाळे,रावसाहेब उल्हाळे, संतोष शेळके,राजेंद्र शिंदे, निवृत्ती नाईकवाडे, प्रभाकर शिंदे,अझहर पठाण,ज्ञानेश्वर शिंदे,योगेश दाते,प्रवीण शिंदे,माणिक शिंदे,अनारसे व परिसरातील ग्रामस्थ, ऊसतोडणी कामगार उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे