Breaking
आरोग्य व शिक्षण

एस.एन.डी.स्कूल बाभुळगाव येथे विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीवर शिक्षकांचे प्रशिक्षण

न्यायभूमी संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 2 0 9 7

न्यायभूमी 

नाशिक दि.११ मार्च पुष्पा पाटील 

येवला – बाभुळगाव – जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित एस एन डी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज बाभूळगाव येथे अध्ययन-अध्यापन अधिक प्रभावी होण्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन शिबिर सदर प्रशिक्षणासाठी लाभलेले प्रशिक्षक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असलेले महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतातील अनेक शाळा व शिक्षकांना प्रशिक्षण दिलेले व स्टेट बोर्ड बालभारतीच्या सायन्स पुस्तकात आपला महत्त्वाचा कंटेंट असलेले मा.श्री. सुनील भाकरे सर यांनी आपल्या पाच तासाच्या प्रशिक्षणात सर्व शिक्षकांना प्रशिक्षण दिले.

नवीन शैक्षणिक बदलांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी तसेच शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यात अधिक गुणवत्ता वाढावी या उद्देशाने शाळेत राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP-2020) तसेच इतर महत्त्वपूर्ण शैक्षणिक विषयांवर शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या प्रशिक्षण कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

प्रशिक्षणादरम्यान राष्ट्रीय शिक्षण धोरणातील प्रमुख बाबी, विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पद्धती, कौशल्याधारित शिक्षण,नवीन अभ्यासक्रम रचना,मूल्यमापनाची आधुनिक पद्धत, तसेच डिजिटल साधनांचा प्रभावी वापर या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

आजच्या बदलत्या शैक्षणिक वातावरणात शिक्षकांनी अध्यापनात नवकल्पना आणणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे आणि शिक्षण अधिक आनंददायी व समजण्यास सोपे बनविणे किती महत्त्वाचे आहे यावरही प्रशिक्षकांनी विशेष भर दिला.

यावेळी शिक्षकांना विविध अध्यापन तंत्रांचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. तसेच गटचर्चा, प्रात्यक्षिके आणि प्रश्नोत्तर सत्रांद्वारे शिक्षकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, विचारशक्ती आणि कौशल्यांचा विकास होईल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे शिक्षकांना आधुनिक शिक्षण पद्धतींची माहिती मिळाली असून भविष्यात अध्यापन अधिक प्रभावीपणे करता येईल,असा विश्वास उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केला.

शाळेच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

 

शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या बदलांशी शिक्षकांनी सतत जुळवून घेत राहणे आवश्यक असून अशा प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे शिक्षकांचा आत्मविश्वास वाढतो, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य यांनी प्रशिक्षकांचे व सर्व शिक्षकांचे आभार मानले आणि भविष्यातही अशा प्रकारचे उपयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतील असे सांगितले

तसेच शिक्षकांनी मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करावा, असे आवाहन केले.

 

सदर प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेले सर्व शिक्षकांनी आपल्या प्रशिक्षणात बहुमूल्य असे मार्गदर्शन देणारे प्रशिक्षक मा.श्री.सुनील भाकरे सर तसेच बहुमूल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देणारे संस्थेचे संचालक मा.श्री.रुपेश भाऊ दराडे तसेच सर्वांना मार्गदर्शन करणारे कॉलेजचे प्राचार्य श्री.शिंदे सर यांचे सर्व शिक्षकांनी मनापासून आभार मानले व भविष्यात असेच मार्गदर्शनपर प्रशिक्षण उपलब्ध करून द्यावे अशी आशा व्यक्त केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 0 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे