Breaking
आरोग्य व शिक्षण

पुरणगाव ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 9 4

न्यायभूमी 

येवला ( पुरणगाव ) दि.२७ जानेवारी पुष्पा पाटील

देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पुरणगाव ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा, पुरणगाव येथे भव्य व उत्साही वातावरणात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली.

या प्रसंगी CISF साक्षी वरे,कमांडो अक्षय ठोंबरे व सैनिक महेश ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष गौरव प्राप्त झाला.

देशसेवेबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व देशप्रेम, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेचे महत्त्व सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कल्पनाताई ठोंबरे होत्या. 

जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक महाजन सर यांनी विद्यार्थ्यांना संविधान मूल्ये,शिस्त व शिक्षणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत,भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य,शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी “जय हिंद”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे