Breaking
महाराष्ट्र

चेंबूर,मुंबई येथील विवेकानंद शैक्षणिक संस्थेच्या विधी महाविद्यालयात एकदिवसीय विधी जागरूकता सत्र संपन्न

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 2 0 9 7

न्यायभूमी न्यूज 

चेंबूर दि २० जुलै 

चेंबूर, मुंबई येथील विवेकानंद शैक्षणिक संस्थेच्या विधी महाविद्यालयात दिनांक १९,जुलै 2025 रोजी विनामूल्य विधी सेवा केंद्र आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,मुंबई,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,मुंबई उपनगर आणि विधी विभाग,टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय विधी जागरूकता सत्र (Legal Awareness Session) आयोजित करण्यात आले होते.

सदरील सत्रास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,मुंबई उपनगर चे मा.सचिव न्या.पवनकुमार तापडिया आणि न्या.मुकुल चितळे यांचे नवयुवक मुलांचे हक्क आणि कायदेशीर सुरक्षा (Rights and Legal Safeguards for Juveniles)यावर मार्गदर्शन लाभले.

तसेच टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई येथील प्रा.डॉ.सोनाली कुसुम यांनी राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण (NALSA) च्या सामान्य किमान कार्यक्रम आणि NALSA (मुलांसाठी बाल-अनुकूल कायदेशीर सेवा) योजना २०२४ यावर माहिती दिली.

तसेच टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई येथील विद्यार्थ्यांचे ध्वनी मुद्रित पथनाट्य सादर केले.

सदरील एकदिवसीय सत्र यशस्वी होण्यासाठी विवेकानंद विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.जयश्री कांचनपुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.दिपाली बाबर,प्रेरणा भंडारी आणि तेजस मायेकर तसेच विद्यार्थी तपस्विनी त्रिपाठी,आयुष यादव आणि कायदेशीर मदत केंद्रा मार्फत डॉ स्वप्निल चौधरी यांनी नियोजन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 0 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे