एकदा वेळ निघून गेली तर,तुम्ही तुम्हाला हवे ते मिळवू शकत नाही – डॉ.हिरालाल पवार
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
नासिक निफाड: दि १५ मार्च मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

आज दि.१५ मार्च रोजी, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. हिरालाल पवार हृदयरोग व मधुमेह तज्ञ यांचे हृदयरोग जागरूकता या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व व्याख्याते डॉ हिरालाल पवार यांचा सत्कार, डॉ. सुजित गुंजाळ सदस्य जनरल बॉडी रयत शिक्षण संस्था सातारा, पंढरीनाथ दरेकर अध्यक्ष स्थानिक सल्लागार समिती क.भा.पा. विद्यालय, सचिन दरेकर सरपंच ग्रामपालिका विंचूर, प्राचार्य देवढे एन ई यांच्या हस्ते करण्यात आला. चांदे आर के लाईफ मेंबर रयत शिक्षण संस्था सातारा यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन दिला.
व्याख्यानाच्या सुरुवातीस डॉ. हिलाल पवार यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले, एकदा वेळ निघून गेली तर तुम्ही तुम्हाला हवे ते मिळवू शकत नाही.
आपण आपली कमकुवत बाजू ओळखून त्यावर काम केले पाहिजे, विद्यार्थ्यांनी अभ्यासाची गती कायम टिकवून ठेवली पाहिजे.
आपले ध्येय ठरवा, मेहनतीला पर्याय नाही, सतत कठोर परिश्रमाने उच्च ध्येय गाठता येते, तुमच्या एका कृतीने तुम्ही तुमचे स्वतःचे, तुमच्या कुटुंबाचे, तुमच्या समाजाचे आयुष्य बदलू शकतात, हार्ड वर्क, हार्ड वर्क आणि हार्ड वर्क, याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही असे विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले.
तसेच उपस्थित सर्व पालक पंचक्रोशीतील नागरिक व विद्यार्थी यांना हृदयरोग या आजाराविषयी मार्गदर्शन केले त्यात प्रत्येक व्यक्तीने नियमित आपल्या शरीराची तपासणी केली पाहिजे.
नियमित व्यायाम, सकस आहाराने आपले शरीर सुदृढ राहते याविषयी मार्गदर्शन केले.
या व्याख्याना प्रसंगी कृष्णा पवार, ॲड.निलेश शिंदे, डॉ.भागवत गुंजाळ, किशोर दरेकर, डॉ.काळे डॉ.जेऊघाले, डॉ.कांगणे, आबासाहेब दरेकर, सतिश शेलार, पत्रकार सुनील क्षिरसागर विद्यालयाचे पर्यवेक्षक जोपळे के जी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्या.टिळेकर आर टी यांनी उपस्थितांचे आभार मानले.


