विंचूर येथील रयत संकुलात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि २९ डिसेंबर दत्तात्रय दरेकर

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात,” शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान “या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ५२वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगिरथ शिंदे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सदर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी संपूर्ण निफाड तालुक्यातील पूर्व प्राथमिक विभाग 38 उपकरणे, प्राथमिक विभाग 101 उपकरणे, माध्यमिक विभाग 68 उपकरणे, दिव्यांग प्राथमिक विभाग 14 उपकरणे, दिव्यांग माध्यमिक विभाग 9 उपकरणे, शिक्षक शैक्षणिक साहित्य प्राथमिक विभाग 19 उपकरणे, शिक्षक शैक्षणिक साहित्य माध्यमिक विभाग 12 उपकरणे, प्रयोगशाळा परिचर दहा उपकरणे, अशी एकूण 271 वैज्ञानिक , गणितीय उपकरणे, शिक्षकांनी तयार केलेले शैक्षणिक साहित्य, प्रयोगशाळा सहाय्यक व परिचारक यांनी तयार केलेले विविध उपकरणे यांची मांडणी करण्यात आली.
या विज्ञान प्रदर्शनाचा समारोप, शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर रोजी ,पंढरीनाथ सयाजी दरेकर अध्यक्ष स्थानिक सल्लागार समिती क.भा. पा. विद्यालय विंचूर यांच्या अध्यक्षतेखाली व , खासदार भास्करराव भगरे सर, आमदार किशोर दराडे , रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य डॉक्टर सुजित गुंजाळ , सुनील मालपाणी सदस्य उत्तर विभागीय सल्लागार समिती रयत शिक्षण संस्था सातारा विंचूर ग्रामपंचायत सरपंच सचिन रत्नाकर दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी,प्रमाणपत्र देऊन व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे खासदार भास्करराव भगरे यांनी एडिसन आणि त्यांचे शोध इ विषयी मार्गदर्शन केले.
तसेच आमदार किशोर दराडे यांनी आजच्या आधुनिक युगातील विज्ञानाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले तसेच शासकीय विज्ञान प्रदर्शन साठी कोणत्याही प्रकारचे अनुदान शासनामार्फत उपलब्ध होत नाही.
उपलब्ध करून देण्याची मागणी मी विधान परिषदेत मागणी करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले व विद्यालयाचे प्राचार्य देवढे एन ई यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा विज्ञान विषयाची रुची निर्माण व्हावी यासाठी विज्ञान प्रदर्शन केले जाते असे सांगितले.
52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विजेते विद्यार्थी व शाळा पूर्व प्राथमिक विभाग प्रथम क्रमांक सार्थक पुरकर व संकेत जाधव अपघात सुरक्षा वाहन जिल्हा प्राथ शाळा आहेरगाव, द्वितीय क्रमांक आरोही काकडे व कार्तिकी बनकर मोबाईल सिग्नल वैनेतय विद्यालय निफाड, तृतीय क्रमांक सर्वज्ञ पवर व आराध्या चव्हाण जादुई गणित जि.प शाळा विंचूर,प्राथमिक विभाग प्रथम क्रमांक स्वरा मोरे ,आर्या शिंदे ब्लड कंट्रोल अलर्ट फ्रिज गीताई वाघ कन्या विद्यामंदिर भाऊसाहेब नगर , द्वितीय क्रमांक सिद्धार्थ कोल्हे, मुकेश जगताप स्मार्ट हेल्मेट बाईक जनता विद्यालय नांदुर्डी, तृतीय क्रमांक सिद्धांत राऊत व साहिल चव्हाण गर्ल्स पर्सनल सेफ्टी गॅझेट कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विंचूर, माध्यमिक विभाग प्रथम क्रमांक साहिल चव्हाणव साहिल जगताप वर्चुअल बटन एल डी पी विद्यालय लासलगाव, द्वितीय क्रमांक दक्षहळंदे व आदित्य जाधव स्व सुरक्षा यंत्रणा के आर विद्यालय मौजे सुकेणे, तृतीय क्रमांक नंदन दिघे व वैभव मोगल ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम, स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालय कोठुरे, दिव्यांग प्राथमिक विभाग प्रथम क्रमांक सार्थक शिंदे साई वाकचौरे रस्त्यावरील दिव्यासाठी सोलर लॅम्प, दिव्यांग माध्यमिक विभाग प्रथम क्रमांक निलेश कराड व आदित्य शभा इमर्जन्सी महिलांसाठी पोर्टेबल सेफ्टी रूम वैनतेय विद्यालय निफाड , शैक्षणिक साहित्य प्राथमिक विभाग प्रथम क्रमांक, सानप जी व्हीकबाड से जुगाड वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर निफाड , द्वितीय क्रमांक वाकचौरे जे बी मनोरंजनातून शिक्षण जि प प्राथमीक शाळा वरहेदारणा, तृतीय क्रमांक पेंढारी एन पी वास्तविक जीवनात भूमिती जिजामाता कन्या विद्यालय लासलगाव, शैक्षणिक साहित्य माध्यमिक विभाग प्रथम क्रमांक मोरे एस बी प्रकाशाचे परावर्तन के के वाघ विद्यालय व जुनिअर कॉलेज भाऊसाहेब नगर, द्वितीय क्रमांक पंडित एस जी भूमिती शास्त्राची बादली वैनतेय विद्यालय निफाड तृतीय क्रमांक पवार ए एम मनोरंजनातून शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विंचूर, शैक्षणिक साहित्य प्रयोगशाळा परिचर प्रथम क्रमांक सांगळे डि के टाकाऊ पासून टिकाऊ माध्यमिक विद्यामंदिर शिवरे, द्वितीय क्रमांक कापसे प्रथमेश सायन्स लॅब इतर बॉक्स वैनतय विद्यालय निफाड, तृतीय क्रमांक जाधव एस पी इनफिनिटी वेल के के वाघ विद्यालय जुनियर कॉलेज भाऊसाहेब नगर, प्राथमिक विभाग उत्तेजनार्थ बक्षीस राणी दरेकर व कल्याणी जाधव जिओमॅट्रिक पार्क ,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर.
प्रदर्शनाचे निरीक्षक म्हणून सोनवणे सुभाष लक्ष्मण परीक्षक म्हणून दिलीप यादव खताळ ,सागर सतीश गमनराव ,संग्राम राजाराम सानप ,संतोष विजय गांगुर्डे, परीक्षित मधुकर घुले , यांनी काम पाहिले.
तसेच शिक्षण विस्तार अधिकारी वसंत गायकवाड, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अधीक्षक प्रशांत गायकवाड, कैलास सोनवणे, जगदीश जेऊघाले,राजाभाऊ गोरे, संजय खैरे, , आत्माराम दरेकर, ज्ञानेश्वर काकड, ज्ञानेश्वर गाडे, किशोर दरेकर, स्नेहल साळी, प्रियंका सोनवणे, सुमन दरेकर, सोनाली कापडणीस, सुनिता शिंदे, मिरा दरेकर, सोमनाथ निकम, सतीश शेलार, संजय शेवाळे, दीपक घायाळ, नीलिमा शिरसाठ,आरती जाधव, केंद्रप्रमुख दिलीप कोथमिरे, सुधाकर जाधव, स्वाती धात्रक आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे व्यवस्थापन व नियमन गटशिक्षणाधिकारी डॉक्टर विजय बागुल, विद्यालयाचे प्राचार्य देवढे एन ई, गीतांजली जाधव अध्यक्ष विज्ञान अध्यापक संघ,पर्यवेक्षक जोपळे के जी यांच्या मार्गदर्शनाखाली , कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विंचूर चे सर्व शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले,सूत्रसंचलन चांदे आर के लाईफ मेंबर रयत शिक्षण संस्था सातारा यांनी व सहकारी शिक्षिका नागने बी आर व सावळे ए वाय यांनी केले.

तसेच आभार प्राध्यापक शिंदे एस डी यांनी मानले.

