Breaking
महाराष्ट्र

मनोबोध ए आय चे थाटात लोकार्पण

1 2 4 1 3 4

न्यायभूमी

नाशिक दिनांक २७ सप्टेंबर २०२६

दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनच्या तंत्रज्ञान शाखेतील टीम ने मनोबोध या रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकावरील ग्रंथाचा आधुनिक तंत्रज्ञानातील कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ये आय ची मदत घेऊन केलेल्या ॲपचे ज्येष्ठ समर्थ भक्त आणि श्री सुंदरमठ सेवा समितीचे विश्वस्त डॉ. विजय लाड यांचे हस्ते अनंत चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर लोकार्पण करण्यात आले.

ऑनलाईन झालेल्या या सोहळ्यात समर्थ रामदास स्वामींच्या अनेक मठांचे मठपती तसेच समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, चिंतक आणि संशोधक उपस्थित होते.

पुण्यातील आनंद जोगळेकर व त्यांचे कुटुंब आणि सहकारी मिळून मनाच्या श्लोकातील रहस्य सहजपणे उलगडण्यासाठी मनोबोध ए आय हे ॲप तयार केले आहे.

विशेषतः तरुण पिढीसाठी हे साधन फारच उपयुक्त आहे. मनाच्या श्लोकातून मानवी जीवनातील ताण-तणाव, कौटुंबिक, आर्थिक , वैचारिक प्रश्नांवर हे ॲप संदर्भांकित ओव्या आणि त्याचा अर्थ देऊन उत्तर देण्याचा प्रयत्न करते.

महत्त्वाचे म्हणजे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांतून विचारलेल्या प्रश्नांना काही क्षणातच संबंधित असलेल्या ओव्या आणि त्यांचा सार भावार्थरूपाने हे ॲप समोर ठेवते.

अध्यात्मिक क्षेत्रातली ही एक क्रांतिकारी घटना होय असे डॉ. विजय लाड यावेळी म्हणाले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वृंदा जोगळेकर अमेय महाबळेश्वरकर, सौ मुग्धा महाबळेश्वरकर,अपर्णा वांगीकर यांनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 2 4 1 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे