Breaking
नोकरी

महावितरणच्या संचालकांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश सविस्तर वृत्त

वीज वितरणाच्या कामात अनधिकृत व्यक्तींचा वापर थांबवा

1 2 3 9 5 3

न्यायभूमी

मुंबई वार शनिवार २६ सप्टेंबर २०२६

महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेचे सुरक्षित संचालन,देखभाल व दुरुस्ती तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची आहे.

मात्र,काही ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून विविध कामांसाठी खासगी व्यक्ती किंवा अनधिकृत मनुष्यबळाचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर महावितरणचे संचालक (संचालन) यांनी अशा प्रकारांना प्रतिबंध करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. 

वीज वितरण यंत्रणेतील तारमार्ग संवर्गामध्ये प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ व तंत्रज्ञ यांची नादुरुस्त वितरण रोहित्र बदलणे,डीओ फ्यूज बदलणे, विद्युत वाहिनीवरील बिघाड शोधणे, वीजपुरवठ्याशी संबंधित तक्रारींचे निराकरण करणे.

वीज देयकांची रक्कम जमा करणे, तसेच वीज ग्राहकांचे वीज मीटर काढणे आदी कामांसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र, काही ठिकाणी ही कामे पूर्ण करण्यासाठी खासगी व्यक्ती किंवा अनधिकृत मनुष्यबळाचा वापर होत असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

अनधिकृत व्यक्तींना काम देणे नियमबाह्य
Central Electricity Authority (Measures relating to Safety and Electric Supply) Regulations, 2023 मधील Regulation 3 नुसार वीज वितरण सेवा, विद्युत वाहिन्या आणि विद्युत उपकरणांवर काम करण्यासाठी केवळ अधिकृत व्यक्तींनाच परवानगी आहे.

त्यामुळे कंपनीने अधिकृत नामनिर्देशित न केलेल्या खासगी व्यक्तींना कंपनीच्या विद्युत यंत्रणेवर कोणत्याही प्रकारचे काम करण्याची परवानगी देणे हे बेकायदेशीर व अनधिकृत स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

अनधिकृत मनुष्यबळाच्या वापरामुळे संबंधित व्यक्ती, कंपनीचे कर्मचारी किंवा ग्राहक यांना प्राणांतिक अथवा अप्राणांतिक अपघात होण्याची तसेच कंपनीच्या मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचेही निर्देशात नमूद करण्यात आले आहे.

अशा प्रकारामुळे कंपनीची प्रतिमा जनमानसात मलिन होत असून विविध स्तरांवर स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.

दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश
अनधिकृत मनुष्यबळाचा वापर करून कंपनीचे कोणतेही काम केल्याचे किंवा अशा प्रकारच्या गैरवर्तनामुळे संबंधित व्यक्ती, कंपनीचे कर्मचारी अथवा ग्राहक यांना अपघात झाल्याचे तसेच कंपनीच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आल्यास विभागीय स्तरावर चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

चौकशीत दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध सेवाविनियमातील तरतुदीनुसार बडतर्फी किंवा सेवासमाप्तीसारखी कठोर शिक्षा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

तसेच क्षेत्रीय कार्यालयातील मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात वीज वितरणाच्या कामांमध्ये अनधिकृत मनुष्यबळाचा वापर होत नसल्याची खातरजमा वेळोवेळी करावी,असे आदेश देण्यात आले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 2 3 9 5 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे