Breaking
महाराष्ट्र

शेअर मार्केट क्षेत्रातील युवा उद्योजक अविनाश सूर्यवंशी यांना मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर !!

MPID प्रकरणात ॲड. रणजित गंगाधर जाधव यांचा युक्तिवाद

1 3 7 8 1 2

न्यायभूमी 

लासलगाव दिनांक १३ ऑक्टोंबर 

महेश साळुंके 

 शेअर मार्केट क्षेत्रातील प्रसिद्ध युवा उद्योजक तथा फॉर्च्यून सोल्युशन्स LLP चे संचालक अविनाश विनोद सूर्यवंशी यांना MPID प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे.

 

फॉर्च्यून सोल्युशन्स LLP च्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास ११ महिन्यांत पैसे दुप्पट करून देण्याचे आश्वासन देऊन जवळपास २६४ गुंतवणूकदारांची सुमारे १२ कोटी ८४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप अविनाश सूर्यवंशी यांच्यावर होता. याप्रकरणी त्यांच्यासह कंपनीचे इतर संचालक व एजंट यांच्याविरुद्ध मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे *भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४०६, ४०९, १२०-ब तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण (आर्थिक आस्थापनांमध्ये) अधिनियम, १९९९ मधील कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, नाशिक यांनी केला होता.

 

 *सत्र न्यायालय, नाशिक यांनी तीन वेळा, मा. मुंबई उच्च न्यायालयाने दोन वेळा व मा. सुप्रीम कोर्टाने एक वेळा* जामीन नाकारल्यानंतर मुख्य संचालक अविनाश विनोद सूर्यवंशी यांनी *ॲड. रणजित गंगाधर जाधव* यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

 

 *जामिनाच्या सुनावणीदरम्यान बचाव पक्षाचे महत्त्वाचे मुद्दे* 

 

दोषारोपपत्रामध्ये तपास अधिकाऱ्यांनी नमूद केलेल्या बाबींनुसार, अर्जदाराने प्रकरणात नमूद केलेल्या रकमेपेक्षा जास्त म्हणजेच *१५ कोटी रुपये बँक ट्रान्सफरद्वारे आणि ६ कोटी रुपये रोख स्वरूपात सहआरोपींना* दिल्याचे दोषारोप पत्रामध्ये ठिकठिकाणी नमूद करण्यात आले आहे.

 

तसेच, सदर रक्कम सहआरोपींनी गुंतवणूकदारांना परत केल्याचे निरीक्षण नाशिक सत्र न्यायालयाने अर्जदाराच्या जामीन अर्जावरील आदेशात नोंदविले असल्याचा मुद्दा बचाव पक्षातर्फे मांडण्यात आला.

 

त्यामुळे अर्जदाराकडून यापुढे कोणतीही रक्कम हस्तगत करणे बाकी नसल्याचे आणि साक्षीदारांची मोठी संख्या लक्षात घेता खटल्याची सुनावणी पूर्ण होण्यास बराच कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे ॲड. रणजित जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

 

बचाव पक्षातर्फे मांडण्यात आलेल्या या युक्तिवादानंतर मुंबई उच्च न्यायालयाने अर्जदार अविनाश विनोद सूर्यवंशी यांना नियमित जामीन मंजूर करून त्यांची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणात ॲड. रणजित गंगाधर जाधव यांनी अर्जदार अविनाश विनोद सूर्यवंशी यांची बाजू मुंबई उच्च न्यायालयात मांडली.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 3 7 8 1 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे