सपोनि भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धारणगाव खडक व वीर येथे’ग्राम सुरक्षा दलाची’स्थापना
न्यायभूमी न्यूज सपादकिय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर (नाशिक) सुनील क्षिरसागर दि.१३ऑगस्ट

दि.१२ ऑगस्ट मंगळवार रोजी मा.पोलिस अधिक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील व मा.अप्पर पोलीस अधिक्षक,नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांचे संकल्पनेतून व मा.उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड के.के.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मा.सहाय्यक पोलीस निरीक्षक लासलगाव पोलीस स्टेशन भास्करराव शिंदे यांनी धारणगाव वीर व धारणगाव खडक गावात जन संवाद अभियान योजना अनुषंगाने मीटिंग घेऊन नागरिकांचे अडचणी समजून घेतल्या.

तसेच ग्रामीण भागातील होणाऱ्या चोऱ्यांना प्रतिबंध व्हावा यासाठी ग्रामसुरक्षा दल स्थापन करून त्यांना करावयाच्या उपाययोजना समजून सांगून लाठी व व्हिसल वाटप करण्यात आली.
यावेळी पोलीस कॉन्स्टेबल सागर आरोटे,पोलीस कॉन्स्टेबल अविनाश सांगळे तसेच धारणगाव गाव खडक सरपंच खंडू सोनवणे,पोलीस पाटील राहुल सोनवणे,धारणगाव वीर गावचे सरपंच दीपक सोनवणे,पोलीस पाटील शरद पुंड गावातील इतर प्रतिष्ठीत नागरिक व ग्रामस्थ हजर होते.


