नूतनच्या मुलींचा सॉफ्टबॉलमध्ये दमदार विजय – विभागीय स्पर्धेसाठी निवड
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
खेडलेझुंगे दि.१०नोव्हेंबर/ बाबा गिते
दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी के.के.वाघ महाविद्यालय,पिंपळगाव येथे जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत नूतन इंग्लिश मीडियम स्कूल, लासलगाव येथील १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
संघामध्ये पुढील खेळाडूंचा समावेश होता —
समृद्धी ठोंबरे (कर्णधार),भक्ती अहिरे (उपकर्णधार),आराध्या सावकार,श्रावणी भोर, श्रद्धा गायकवाड,स्वरा खाडे,प्रांजल नरोटे, कोमल राजोळे,संस्कृती गांगुर्डे.संघाच्या यशामागे शाळेच्या क्रीडा प्रशिक्षक कोमल आव्हाड तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.गणेश जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल शाळेचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर,व्यवस्थापक समितीचे चेअरमन संदीप होळकर, सदस्य हसमुख पटेल,योगेश पाटील, सचिन मालपाणी,चंद्रशेखर होळकर, मुख्याध्यापिका शितल आचार्य, उपमुख्याध्यापिका मीनल होळकर तसेच सर्व विभाग प्रमुखांनी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
विजयी संघाचे सर्वत्र कौतुक होत असून जळगाव येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी संपूर्ण संघाला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.