Breaking
महाराष्ट्र

लासलगाव-विंचूर रस्त्याबाबतच्या शंकांचे निरसन व्हावे:–काँग्रेस नेते सचिन होळकर यांची मागणी

न्यायभूमी न्यूज

0 8 9 9 8 5

न्यायभूमी

लासलगाव दि.२० जानेवारी निशिकांत पानसरे

सध्या लासलगाव विंचूर या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या कडेचे मोठे चिंचेचे झाडे तोडण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे मात्र या रस्त्याबाबत नागरिकांच्या मनात अनेक शंका आणि प्रश्न आहे त्यांचे निराकरण प्रशासनाच्या माध्यमातून व्हावे यासाठी सचिन होळकर यांनी अनेक स्तरावर मागणी केली आहे.

लासलगाव विंचूर रस्त्याच्या रुंदीकरणाचा नेमकी रुंदी किती आहे तसेच त्यासोबत गटार आहे का तसेच रस्त्याला विभाजक आहे का याबाबत जनतेच्या मनात प्रश्न आहे.लासलगाव विंचूर रस्त्याच्या अगदी लगतच सोळागाव पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन गेलेली आहे.

सदर रस्ता रुंदीकरणांमध्ये ती पाईपलाईन पूर्णपणे निघणार आहे अशा परिस्थितीत लासलगाव शहराला पाणीपुरवठा कसा होणार हा मुख्य प्रश्न आहे. अगोदरच वेगवेगळ्या कारणांनी लासलगाव शहराला उशिराने पाणीपुरवठा होत आहे त्यातच रस्त्यांची कामे पाच-सहा महिने चालल्यास पाणीपुरवठ्याचे नियोजन कसे करणार याबाबत शंका आहे.

लासलगाव विंचूर रस्त्याचा बाजूने अनेक विद्युत खांब आहे त्यांचे नियोजन करावे लागणार. रस्ता रुंदीकरणामध्ये येणाऱ्या नागरिकांच्या मालमत्ता तसेच बांधकाम याबाबत या नागरिकांना पूर्वसूचना देणे अत्यंत आवश्यक आहे.

याच रस्त्यावर अनेक ठिकाणी पूल आहे पाणीपुरवठ्याच्या तसेच शेतकऱ्यांच्या पाईपलाईन त्या खालून गेलेल्या आहेत त्यांचे नियोजन कसे करणार या व इतर अनेक शंकांबाबत ग्रामपंचायत स्तरावर जनतेची बैठक घेऊन त्यांच्या मनातील शंका आणि प्रश्नांचे निरसन करणे आवश्यक आहे.

पाणीपुरवठा विद्युत पुरवठा खंडित होणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी आणि नियोजन करणे अपेक्षित आहेत या सर्व बाबींसाठी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस सचिन आत्माराम होळकर यांनी वरिष्ठ स्तरावर विचारणा केली आहे.

जनतेच्या मनातील संपूर्ण शंकांचे निरसन केल्याशिवाय रस्त्याचे काम सुरू करू नये अशी मागणी सचिन होळकर यांनी प्रशासनाकडे केली आहे..

2.3/5 - (7 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे