वाजे विद्यालयात माजी विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक मेळावा उत्साहात संपन्न
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
सिन्नर दि १० फेब्रुवारी प्रतिनिधी:-
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सिन्नर येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे तालुका संचालक कृष्णाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक बी.आर.जाजू होते.व्यासपीठावर जे.बी.पगार, येवलेकर ,बी.आर.कहांडळ, मोहन कणसे,किशोर जाधव,के.आर.गोसावी, प्रा. राजाराम मुंगसे,एस.आर पगार,व्ही.एन.शिंदे,रामदास वाजे ,सुरेश गीते,विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब देशमुख व पर्यवेक्षक राम ढोली आदी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित माजी मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक, शिक्षक व माजी विद्यार्थी यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब देशमुख यांनी केले.
त्यात त्यांनी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यापाठीमागचा उद्देश आपला प्रास्ताविकातून व्यक्त केला . माजी विद्यार्थी अतुल साळवे,किरण डगळे,समाधान आव्हाड, निलेश कुर्हाडे,भरत शिंदे,महेश पवार,गायत्री मांडे,मनिषा भालेराव यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थी दशेतील जुन्या आठवणीना उजाळा दिला. सर्वच माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाला सहकार्य व मदत करण्याचे आश्वासन दिले.
शिक्षक संजय गुजर सर यांनी मनोगत व्यक्त केले. य कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक आर.बी. जाजू यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सर्व माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाला सहकार्य करावे असे आव्हान केले. यावेळी इ. डी.चव्हाण, एकनाथ खैरनार,वर्षा सोनवणे ,पद्मरेखा जाधव ,प्रभाकर फटांगळे, शिवनाथ पांगरकर, शांताराम चांदोरे, सोमनाथ गिरी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र शिंदे यांनी तर विद्यालयाचे पर्यवेक्षक अशोक निंबाळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व विद्यालयातील शिक्षक, उपशिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थितीत होते.


