Breaking
गुन्हेगारी

देवगाव येथील निलख वस्ती व भवानी नगर अंगणवाडी केंद्रात चोरी

न्यायभूमी संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 8 8

न्यायभूमी 

 देवगाव दि २८ नोव्हेंबर अजिज काद्री

 देवगाव येथील निलख वस्ती व भवानी नगर येथे चोरट्यांनी अंगणवाडी मधील पोषण आहार आणि साहित्याची चोरी केली.

निलख वस्ती अंगणवाडीत तिसऱ्यांदा चोरी झाली आहे.

   अंगणवाडी जवळ असलेल्या जय जनार्दन स्वामी मंदिर भक्त पहाटे साफसफाईला आल्यानंतर जनार्दन स्वामी मंदिराचा कडी कोंडा तुटलेला पाहून काहीतरी अपरित घटना घडल्याचा संशय आला.

मागेही चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीतील पैसेचोरी केले होते.परंतु यावेळी चोरट्यांना चोरीसारखे काही न सापडल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा मंदिरा जवळ असलेल्या भवानी नगर अंगणवाडी कडे वळवला,तेथील पोषण आहारातील,साखर,गोडेतेल,तसेच झोळीचा वजन काटा हे सर्व साहित्य चोरीस गेले.

 भवानी नगर अंगणवाडीच्या चोरीनंतर दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या निलख वस्ती अंगणवाडी केंद्रातील गोडतेल,साखर,भारत गॅस टाकी सिलेंडर चोरीस गेले.

 या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील सुनील बोचरे,तंटामुक्ती अध्यक्ष गोपीनाथ बोचरे यांनी यांनी लासलगाव पोलीस स्टेशनला कळवले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप शिंदे, बस्ते,उप सरपंच लहानु मेमाने,ग्रामस्थ यांनी पंचनामा केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे