न्यायभूमी न्यूज
नासिक दि ०३ जून : जिल्हा प्रतिनिधी सुनील क्षिरसागर
नाशिक मधील त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहण होणार आहे.
हा भव्य धार्मिक सोहळा तब्बल १८ महिने म्हणजेच ३१ ऑक्टोबर ते जुलै दरम्यान नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे संपन्न होणार आहे. या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
कुंभमेळा अधिक दीर्घकालीन आणि नियोजित स्वरूपात पार पडणार आहे.
यामध्ये ३ मुख्य शाही स्नान आणि ४२ पर्व स्नान समाविष्ट असणार आहेत.
शाही स्नान जुलै ते सप्टेंबर दरम्यान दीड महिन्याच्या कालावधीत पार पडणार आहेत.
२९ जुलै २०२७ रोजी नगर प्रदक्षिणा होईल. तर पहिले अमृतस्नान हे सोमवारी, २ ऑगस्ट २०२७ रोजी पहिले शाही स्नान होणार आहे. तर या महाकुंभातील दुसरं अमृतस्नान ३१ ऑगस्ट २०२७ रोजी होणार आहे. तर तिसरं आणि शेवटचं अमृतस्नान हे ११ सप्टेंबर २०२७ रोजी नाशिक येथे होईल.
कुंभमेळा नियोजन संदर्भात होणाऱ्या बैठकीत कुंभमेळा मध्ये होणाऱ्या अमृत्स्नान तारखा जाहीर
– त्रंबकेश्वर अमृतस्नान तारीख जाहीर –
ध्वजारोहण करून कुंभ पर्वाला सुरुवात
पहिले अमृतस्नान – २/८/२०२७2
द्वितीय अमृतस्नान –३१/८/२०२७
तृतीय अमृतस्नान – १२/९/२०२७
– नाशिक कुंभ अमृतस्नान –
३१/१०/२०२६ ध्वजारोहण करून कुंभ पर्वाला सुरुवात
पहिले अमृतस्नान -२/८/२०२७2
द्वितीय अमृतस्नान –३१/८/२०२७
तृतीय अमृतस्नान – ११/९/२०२७



