Breaking
कृषीवार्ता

वीज आणि पाण्याच्या तीव्र टंचाई विरोधात संगमनेर शहरात काढण्यात आलेल्या ‘जनआक्रोश मोर्चा’ला हिंसक वळण

संगमनेरमधील जनआक्रोश मोर्चात मोठा राडा; संतप्त आंदोलकांकडून कार्यालयात तोडफोडीचा प्रयत्न

1 3 2 5 2 6

न्यायभूमी 

 अहिल्यानगर (संगमनेर) दिनांक २२ सप्टेंबर

वीज आणि पाण्याच्या तीव्र टंचाई विरोधात संगमनेर शहरात काढण्यात आलेल्या ‘जनआक्रोश मोर्चा’ला हिंसक वळण लागले असून, संतप्त आंदोलकांनी थेट प्रांताधिकारी कार्यालयात घुसून प्रचंड गोंधळ घातला.

संतप्त झालेल्या आंदोलकांनी कार्यालयातील साहित्याची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला, तसेच थेट दालनात शिरून प्रांताधिकाऱ्यांची रिकामी खुर्ची उचलून खाली फेकल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

या प्रकारामुळे महसूल व पोलीस प्रशासनाची एकच धावपळ उडाली असून संगमनेरमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा, अघोषित भारनियमन बंद करणे आणि जळालेले ट्रान्सफॉर्मर बदलणे या प्रमुख मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी वेळेवर उपस्थित न राहिल्याने अथवा योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे आंदोलकांच्या संयमाचा बांध फुटला. शेकडो कार्यकर्ते घोषणाबाजी करत थेट प्रशासकीय इमारतीत शिरले.

दालनात प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवत आंदोलकांनी घोषणाबाजी केली आणि संतप्त झालेल्या काही आंदोलकांनी थेट अधिकाऱ्यांची खुर्ची भिरकावून दिली.

या अचानक घडलेल्या प्रकारामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलकांना दालनातून बाहेर काढले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

या घटनेनंतर प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 3 2 5 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे