Breaking
कृषीवार्ता

विंचूर परिसरात पावसाच्या ओढीसह विजेचा लपंडाव

शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट : पिकांना पाण्याची नितांत गरज,मात्र भारनियमनाने शेतकरी हवालदिल

1 3 2 5 0 6

न्यायभूमी 

विंचूर : दिनांक २१ सप्टेंबर सुनील क्षिरसागर 

विंचूर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत.

कडक ऊन आणि कोरड्या हवामानामुळे मका व सोयाबीन पिके सुकण्याच्या मार्गावर असून शेतातच पाने कोमेजू लागली आहेत.

त्यातच महावितरणकडून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी भर पडली असून शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने मका, सोयाबीनसह इतर पिकांची चांगली उगवण झाली होती. शेतकऱ्यांनी महागडी बियाणे, खते आणि मजुरीवर मोठा खर्च करून पिके जोपासली.

मात्र, ऐन वाढीच्या काळातच पावसाने प्रदीर्घ विश्रांती घेतल्यामुळे जमिनीतील ओलावा संपुष्टात आला आहे. सध्या पिकांना दाणे भरण्याच्या आणि वाढीच्या अवस्थेत पाण्याची अत्यंत नितांत गरज आहे.

वीज वितरणचा खेळखंडोबा; सिंचनाचे नियोजन कोलमडले विहिरी आणि बोअरवेलमध्ये थोडेफार पाणी शिल्लक असले तरी वीजपुरवठ्याच्या खेळखंडोबामुळे पिकांना पाणी देणे अशक्य होत आहे.

दिवसा आणि रात्री वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाने मिळणारी वीज यामुळे कृषिपंप चालवणे कठीण झाले आहे. वीज कधी येईल आणि कधी जाईल याचा नेम नसल्याने शेतकऱ्यांना भररात्री शेतात ताटकळत बसावे लागत आहे.

आणखी काही दिवस पाऊस न झाल्यास ही पिके पूर्णपणे जळून हातचे जाण्याची भीती व्यक्त होत असून उत्पादनात प्रचंड घट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने शेतीसाठी अखंडित आणि सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी जोरदार मागणी विंचूर परिसरातील शेतकरी करत आहेत.

प्रतिक्रिया “पाऊस नसल्याने मका आणि सोयाबीनची पिके डोळ्यादेखत जळत आहेत. खते, बियाण्यांवर केलेला मोठा खर्चही निघेल की नाही अशी स्थिती आहे.

विहिरीत शिल्लक असलेल्या पाण्यावर पिके जगवण्याचा प्रयत्न करतोय, पण वीज अजिबात टिकत नाही.

वारंवार वीज जात असल्याने पिकांना पाणी भरता येत नसून आमचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे.” — भरत जाधव, शेतकरी, विंचूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 3 2 5 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे