Breaking
राजकिय

निमगाव मढच्या माजी सरपंच मनीषा लभडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

ग्रामपंचायत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील गुन्ह्यात दिलासा

1 3 2 5 2 5

न्यायभूमी 

नाशिक : दिनांक१३ ऑक्टोंबर महेश साळुंके 

ग्रामपंचायत आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांतर दाखल झालेल्या गुन्ह्यात निमगाव मढच्या माजी सरपंच मनीषा नवनाथ लभडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

निमगाव मढ ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. तत्कालीन सरपंच मनीषा लभडे आणि ग्रामसेवक महेश रामदास महाले यांनी शासनाच्या विविध योजनांमध्ये सुमारे १ कोटी ८९ लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप त्यात होता. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली होती.

 

या तक्रारीनुसार स्थानिक निधी लेखा परीक्षण, नाशिक विभागाचे सहसंचालक यांच्यामार्फत २०१७-१८ आणि २०२१-२२ या कालावधीचे लेखापरीक्षण २९ जून ते १० जुलै २०२३ दरम्यान करण्यात आले. त्या लेखापरीक्षणाच्या आधारे लभडे आणि तत्कालीन ग्रामसेवक यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४०६, ४०९ व १२०-ब अन्वये येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

 

येवला सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर लभडे यांनी अ‍ॅड. रणजित जाधव यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.

 

लेखापरीक्षणावर आक्षेप

 

अर्जादारांचे वकील अ‍ॅड. रणजित गंगाधर जाधव यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, हे लेखापरीक्षण बोगस आहे. लेखापरीक्षकांनी ग्रामपंचायत कार्यालयाला प्रत्यक्ष भेट न देता मनमानी पद्धतीने आकडेवारी तयार केली, असे त्यांचे म्हणणे होते.

 

लभडे यांचे पती आणि निमगाव मढचे माजी सरपंच नवनाथ लभडे यांनी हे लेखापरीक्षण रद्द करण्यासाठी संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर संचालकांनी हे लेखापरीक्षण अवैध ठरवून तज्ज्ञ व अनुभवी लेखापरीक्षकांमार्फत फेर-लेखापरीक्षण करण्याचा आदेश २१ एप्रिल २०२५ रोजी दिला.

 

अ‍ॅड. जाधव यांनी न्यायालयाला सांगितले की, संपूर्ण प्रकरण याच लेखापरीक्षणावर आधारित आहे आणि तेच अवैध ठरल्याने अर्जादाराने अपहार केल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होत नाही. हा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने योग्य त्या अटी-शर्तीवर मनीषा लभडे यांना अटकपूर्व जामीन केला.

 

हा गुन्हा केवळ राजकीय द्वेषतून दाखल करण्यात आला होता, .अटकपूर्व जामीन मिळाल्याने न्याय मिळल्याची आणि समाधानाची भावना आहे.

मनीषा लभडे 

सरपंच -निमगाव   मढ

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 3 2 5 2 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे