समतादूतांचा संकल्प- समता व सामाजिक न्यायाच्या योजनांचा प्रचार

न्यायभूमी
हिंगोली :दिनांक १७ ऑक्टोंबर
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे, समतादूत हिंगोलीच्या वतीने सेवा संकल्प अभियान (दिनांक 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर )निमित्ताने कर्मवीर दादासाहेब गायकवाड चौक रिसाला, हिंगोली येथे दिनांक 15 ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी 10:30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी कर्मवीर दादासाहेब गायकवाड व माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड व माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मान्यवर जेष्ठ नेते मा. मधुकर मांजरमकर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजभूषण पुरस्कार प्राप्त यांचा सुरेश पठाडे यांनी समतादूतांच्या वतीने भारतीय संविधान उद्देशीका फ्रेम भेट देऊन सत्कार करण्यात आला. श्री मांजरमकर यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जीवनसंघर्षावर प्रकाश टाकत समतादूतांचे कार्य समता व सामाजिक न्यायाच्या योजना समाजाच्या तळागाळापर्यंत प्रचार-प्रसारांचे समाज उपयोगी कार्य उत्तम असल्याचे व्यक्त केले.
बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे, समतादूत सुरेश पठाडे,चंद्रमुनी मांजरमकर, प्रीतम सरकटे,माधव वाढवे, माधव आठवले, राजनंदनी सुनील ठोके,गजराज साळवे, आदींची उपस्थिती होती.




