Breaking
महाराष्ट्र

शासकीय तंत्रनिकेतन नाशिकचे डॉ.जयंत जोशी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गौरव; संशोधन व गुणवत्तेचा सन्मान

1 2 0 4 3 4

न्यायभूमी 

नाशिक दिनांक.१३ सप्टेंबर

शासकीय तंत्रनिकेतन, नाशिक येथील व्याख्याता (निवड श्रेणी) डॉ. जयंत गजानन जोशी यांना महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा प्रतिष्ठित ‘डॉ. जे. पी. नाईक राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार (२०२५-२६)’ प्रदान करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते डॉ. जोशी यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

संशोधन व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर भर

डॉ. जयंत जोशी यांनी आपल्या प्रदीर्घ अध्यापन कारकिर्दीत विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, नवनवीन उपक्रम आणि उद्योजकतेची सांगड घालण्यावर भर दिला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधक वृत्ती वाढीस लागावी यासाठी त्यांनी सतत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या प्रकल्पांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करून संस्था तसेच महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास

उत्कृष्ट तांत्रिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक बांधिलकी रुजवण्यासाठी डॉ. जोशी सदैव प्रयत्नशील राहिले आहेत. सक्षम अभियंता घडवतानाच संवेदनशील आणि सुसंस्कृत नागरिक घडवण्याचा त्यांचा शैक्षणिक ध्यास राहिला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन शासनाने त्यांना हा पुरस्कार जाहीर केला.

 

या यशाबद्दल शैक्षणिक आणि सामाजिक स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 2 0 4 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे