Breaking
महाराष्ट्र

लाडक्या गणरायाचे भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात विसर्जन..

न्यायभूमी न्यूज सहसंपादक सुनील पोळ

1 3 2 5 2 3

न्यायभूमी 

वडाळीभोई दिनांक २० सप्टेंबर

 वडाळीभोई येथील मविप्र समाज संस्था नाशिक संचलित जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि अभिनव बाल विकास मंदिर वडाळीभोई येथे आज शनिवार दिनांक 19 सप्टेंबर 2026 रोजी गणपती बाप्पाला मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने निरोप देण्यात आला.

शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ. संगीता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शालेय सांस्कृतिक समिती यांच्या नियोजनानुसार अभिनव बाल विकास मंदिरच्या मदतीने इयत्ता दहावी अ च्या वर्गाकडे गणपती बाप्पा स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंतची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री मोहन यशवंते यांनी सपत्नीक आजच्या गणपती विसर्जनाची पूजा करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. शालेय वाद्यवृंद व लेझीम नृत्याच्या तालावर भक्तीमय वातावरणामध्ये पर्यावरणपूरक गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

गणपती विसर्जनाच्या आजच्या या खास प्रसंगी अभिनव बाल विकास मंदिर ते उच्च माध्यमिक विद्यालय पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय परिवारातील प्रत्येक घटकाचे अनमोल सहकार्य लाभले.

3/5 - (2 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 3 2 5 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे